https://youtu.be/NSvT8w4CTLI?si=739PKH9PZzokrXlg
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
शतकमहोत्सवी वर्षाची नांदी
१९२५ पासून ते २०२४ पर्यंत गेली ९९ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ना त्या कारणाने चर्चेत राहिला. संघासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असणारे जसे अनेक स्वयंसेवक आहेत तसेच संघाचा दुस्वास करणारे लोकही खूप आहेत. त्यामुळे एकीकडे संघाला सर्वतोपरी मानणारे लाखो करोडो लोकं तर संघाचा दुस्वास करणारे काही लोक. हे दोन्ही जरी अस्तित्वात असले, दोन्ही गोष्टी जरी सत्य असल्या तरीही संघाला वगळून या देशाचा आधुनिक इतिहास हा लिहिलाच जाणार नाही. किंबहुना तसा कोणी प्रयत्न जरी केला तरी तो यशस्वी होणार नाही एवढं भल मोठ काम संघाने गेल्या ९९ वर्षात देशासाठी, देशवासियांसाठी व समस्त भारतीयांसाठी उभे करून ठेवले आहे.
संघाची स्थापना १९२५ साली झाली. संघाच्या स्थापनेचा तत्कालीन आणि आजही जो हेतु होता तो फक्त आणि फक्त ‘हिंदू संघटन’ हाच होता व आहे. या देशामध्ये बहुसंख्यांक असलेले हिंदु संघटीत नाहीत. त्यामुळे त्यांचा आवाज क्षीण आहे हे लक्षात आल्यानंतर या असंघटीत हिंदूंचे एक अतिशय कणखर व बलशाली पण तेवढेच शिस्तबद्ध संघटन व्हावे , संघटन करावे अशी इच्छा सर्वप्रथम कोणाला झाली असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांना. आता त्यांची ही इच्छा अचानक जागृत झाली का? अचानक त्यांच्या मनात संगठन उभे करावे असे वाटले का? त्यावेळची राजकीय आणि सामाजिक स्थिती काय होती? असं काय झालं की डॉक्टरांच्या मनात हिंदुंची अशी संघटना असावी अस वाटायला लागले?
१९२५ साली ज्यावेळी संघाची स्थापना झाली त्याआधीच्या पाच-सहा वर्षांची आपण पार्श्वभूमी पाहिली व तपासली तर आपल्या लक्षात येईल की १९१९ ते १९२५ हा पाच-सहा वर्षांचा कालखंड हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी सर्वात सुपिक कालखंड होता. संघाच्या बीजाचे एका वटवृक्षात रूपांतर करण्यास लागणारी एक सुपीक व कसदार जमीन याच कालखंडात डॉक्टरांना गवसली होती. संघ स्थापनेचा विचार मनामध्ये येण्यासाठीची कारणे जेवढी महत्त्वाची होती तेवढीच ती गंभीर व चिंता उत्पन्न करणारी होती.
१९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले. काँग्रेसचे ते अतिशय आघाडीचे लोकप्रिय आणि प्रमुख नेते होते. डॉक्टर हेडगेवार हे संघाची स्थापना करण्याआधी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते व काँग्रेसमध्ये कार्यरतही होते. गीतारहस्य हा भगवतगीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य टिळक हा कांग्रेस मधील एक हिंदू आवाज होता, चेहेरा होता. परंतु दुर्दैवाने १९२० साली लोकमान्य टिळकांच्या अकाली मृत्यूनंतर काँग्रेसचे नेतृत्व हळूहळु महात्मा गांधींच्या हातात सरकत गेलं. मुस्लिम लीग अधिक आक्रमक होत होती. हा तोच कालखंड होता की मोहंमद अली जीना यांनी काँग्रेसमध्ये रुची दाखवायला सुरुवात केली होती. महात्मा गांधींच्या आग्रहावरून ज्या खिलाफत चळवळीचा भारताशी काडीमात्रही संबंध नव्हता, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी काहीही संबध नव्हता.
तुर्कस्तानातील 'खलिफा' ही पदवी धारण करणाऱ्या मुस्लिम सत्ताधीशाला केमाल पाशा या सुधारणावादी नेत्याच्या मदतीने दोस्त राष्ट्रांनी पदच्युत केले. दोस्त राष्ट्रांना आणि केमाल पाशाच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या एका सुधारणावादी राजवटीला विरोध करणाऱ्या कट्टरपंथी मुस्लिमांनी सुरू केलेली चळवळ म्हणजेच खिलाफत चळवळ होय.
खर तर हा त्या देशाचा प्रश्न होता, त्या देशातील नागरिकांचा प्रश्न होता. भारताचा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि भारतामध्ये असलेल्या बहुसंख्य ८५ टक्के हिंदूंचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. असं असूनही महात्मा गांधींनी खिलापत चळवळीला काँग्रेसच्या पाठिंब्याने एक राष्ट्रीय स्वरुप दिले व मुस्लिम धर्मातील जागतिक इस्लाम संकल्पनेचे एक रूप म्हणजे खिलाफत चळवळीला राष्ट्रीय स्वरुप देवून मुस्लिम लांगूलचालनाला सुरुवात केली. तेंव्हापासून गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा मुस्लिम धार्जिणा चेहरा हळूहळू उघड होऊ लागला. त्याच सुमारास केरळमध्ये मोपल्यांचे बंड झाले. हजारो हिंदू ठार मारले गेले. शेकडो हिंदू मंदीरे केरळमध्ये तोडली गेली. हजारो हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आले. शेकडो हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले. परंतु दुर्दैवाने याविरोधात काँग्रेसच्या कोणीही नेत्याने आवाज उठवला नाही. गांधी सुध्दा मिठाची गुळणी घेवून गप्प बसले होते.
या तीन गोष्टी, लोकमान्य टिळकांचे निधन, खिलाफत चळवळ आणि मोपल्यांचे बंड यांचा खूप मोठा प्रभाव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या निमित्ताने पडलेला दिसतो. यामुळे सर्वच हिंदूंनी, या भारतभूमीच्या सर्व भूमिपुत्रांनी, सर्व नागरिकांनी, ज्यांची या देशावर श्रद्धा आहे, या संस्कृतीवर श्रद्धा आहे, अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन अशी एक संघटना उभी करावी ज्या संघटनेत जात नसेल, पात नसेल, पंथ नसेल, वर्ण नसेल, वर्ग नसेल , फक्त आणि फक्त धर्म आणि संस्कृतीचाच विचार असेल. अशा प्रकारची संघटना बांधण्याची मनोवृती डॉ. हेडगेवार यांची झाली. याच पार्श्वभूमीवर विजयादशमीला १९२५ साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गेल्या ९९ वर्षाचा इतिहास हा एखाद्या लाटेप्रमाणे आहे. कधी संकटे झेलणारा तर कधी संकटातून तारणारा. महात्मा गांधींच्या हत्येनंतर १९४८ साली संघावर बंदी घालण्यात आली. १९७५ साली इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी जाहीर केली त्यावेळीही संघावर बंदी आणण्यात आली. त्यानंतर १९९२ साली बाबरीचा विवादीत ढाचा पाडला गेला त्यावेळीही संघावर बंदी घालण्यात आली होती. या तीनही कसोटीच्या कालखंडातुन संघ अतिशय तावून सुलाखून बाहेर पडला. एवढंच नव्हे तर संघाच्या मुशीत व संस्कारात घडलेल्या अटल बिहारी वाजपेई व नरेंद्र मोदी सारख्या प्रचारक तथा स्वयंसेवकांना एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन तीन वेळा हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याचा बहुमान मिळाला.
आधुनिक भारताच्या इतिहासात संघाचे राजकीय व सामाजिक योगदान एवढे आहे की ते अधिक विस्ताराने सांगण्यासाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लेखाजोखा वाचकांसमोर मांडण्यासाठी मी हे सदर लिहिणार आहे. संघाच्या शतकपूर्ती वर्षाच्या निमित्ता सुरू केलेली ही लेखमाला आपल्याला नक्कीच आवडेल असा विश्वास आहे.
खूप सुंदर लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवाउत्तम लेखन...
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवाअभिनंदन
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवासंगौघाची अप्रतिम मांडणी !
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवासुरेख, माहिती पूर्ण. अशा थोडक्यात माहिती देणाऱ्या, ओळख करून देणाऱ्या ब्लॉग ची गरज होती
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवासुरेख!! अशा माहितीची आवश्यकता होती. उत्तम, अभ्यासपूर्ण !!
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवाछान माहिती. आपत्ती काळात संघाला लोक कार्यात भाग घेताना पाहिले आहे. साहेब, आपले profile जबरदस्त.
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षाची नांदी
उत्तर द्याहटवा(श्री अवधूत वाघ यांच्या लेखनाचा अभिप्राय)
श्री अवधूत वाघ यांनी "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षाची नांदी" या लेखात 1925 ते 2024 या 99 वर्षांच्या कालखंडातील संघाचा व्यापक आढावा घेतला आहे. लेखामध्ये अभ्यासपूर्ण दृष्टिकोन, ओघवती भाषा, आणि विचारप्रधान मांडणी यांचा सुरेख संगम दिसतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल प्रेम आणि दुस्वास यांचे स्पष्ट विवेचन लेखकाने प्रभावी पद्धतीने केले आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी देशासाठी निस्वार्थीपणे दिलेले बलिदान आणि त्याचे फळ आज भारतीय जनता पक्षाच्या रूपाने देशाला खंबीर नेतृत्व देत आहे, हे लेखकाने अभ्यासपूर्वक मांडले आहे.
संघाची स्थापना, त्याचे उद्दिष्ट, आणि त्यामागील डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची दूरदृष्टी याचे विश्लेषण विचारप्रवर्तक आहे. हिंदुत्व जपण्यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि संघाच्या माध्यमातून निर्माण झालेली सर्वांत मोठी सामाजिक संघटना यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे.
श्री वाघ यांनी खिलाफत चळवळीवरही अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे. सामान्य माणसांच्या मनातील गैरसमज दूर करताना त्यांनी या चळवळीचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी कसा संबंध नाही, हे प्रभावीपणे स्पष्ट केले आहे. गांधीजींच्या नेतृत्वाची मर्यादा, मुस्लिम नेत्यांचा प्रभाव, आणि त्याचे विपरीत परिणाम यावरही त्यांनी योग्य दृष्टिकोनातून विवेचन केले आहे.
केरळमधील मोपल्यांचे बंड आणि तेथील हिंदूंवर झालेले अत्याचार यासारख्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत लेखकाने खऱ्या इतिहासाचा खुलासा केला आहे. बऱ्याच सामान्य नागरिकांना माहीत नसलेल्या ऐतिहासिक सत्यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे, ज्यामुळे वाचकांच्या विचारांची दृष्टी अधिक व्यापक होते.
संघाच्या संस्कारातून तयार झालेली महान व्यक्तिमत्त्वे आणि निस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्यांची फळी यांचा गौरवपूर्ण उल्लेख लेखात आढळतो. तसेच संघाच्या स्थापनेपासून सर्व संघचालकांचे परिचय देऊन त्यांनी संघाच्या शतक महोत्सवाची समर्पक सुरुवात केली आहे.
आम्ही श्री अवधूत वाघ यांना नम्र विनंती करतो की त्यांनी असेच लेखन सुरू ठेवावे. त्यांचे विचार आणि ज्ञान समाजासाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांच्या लेखनाने वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.सप्रेम,
चंद्रकुमार मधुकर देशमुख
cmdesmukh1959@gmail.com
धन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवासुंदर लिखाण आणि सखोल अध्ययन. आपल्या पुढच्या लेखाची आतुरतेंने वाट बघत आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवा