राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
माझ्या आधीच्या लेखात संघ
स्थापनेची जी महत्त्वाची कारणे होती त्यात खिलाफत चळवळ हे एक महत्त्वाचे कारण होते
असे मी नमूद केले आहे. आजच्या पिढीला याविषयी
माहिती व्हावी म्हणून संघ स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेल्या खिलाफत चळवळी विषयी अधिक
लिहिणे योग्य व क्रमप्राप्त ठरेल.
पहिल्या महायुद्धात
तुर्कस्थान वा तत्कालिन ऑटोमन साम्राज्य हे दोस्त राष्ट्रांच्या विरोधात व जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया आदी राष्ट्रांसोबत लढले व त्यात ऑटोमन
साम्राज्याचा पराभव झाला. त्यावेळी फ्रान्स, इंग्लंड, रशिया आदी दोस्त
राष्ट्रांनी तत्कालीन ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात असलेले प्रदेश आपापसात वाटून
घेतले. इंग्रजांनी त्या साम्राज्याच्या
सुलतानाला, जो जगभरातील सर्व मुस्लिमांसाठी खलिफा होता, ‘सकल इस्लाम’ या कल्पनेचे प्रातिनिधिक व जिते जागते उदाहरण
होता, त्याला बंडखोर उच्चपदस्थ सैन्याधिकारी व
सुधारणावादी नेता केमाल पाशाच्या मदतीने सत्तेतून पायउतार करुन देशोधडीला लावले.
इंग्रजांच्या या
कृत्यामुळे जगभरातील सर्व मुस्लिम समुदाय इंग्रजांवर नाराज झाला होता अशी मांडणी
काही पुरोगामी लेखक करतात ती वस्तुस्थितीच्या अगदी विपरीत आहे.
खर पहाता तुर्कस्थानच्या इस्लामिक सुलतानाला त्याची राजगादी व ‘खलिफा’ पद परत मिळवुन देण्यासाठी
अती महत्वाकांक्षी कडव्या भारतीय
मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती. ऑटोमन साम्राज्य लयाला जाणे व खलिफा खारीज होणे हे फक्त निमित्त होते परंतु या निमित्ताने
दार-उल-हर्ब (पापी लोकांची भूमी) म्हणजेच हिंदुस्तानला दार-उल-इस्लाम बनवणे
म्हणजेच हिंदुस्थानात शरियत कायदा आणून इस्लामी राजवट आणणे हा त्यामागील छूपा पण
तेवढाच स्पष्ट हेतू होता.
खिलाफत चळवळ ही एक केवळ
चळवळ नव्हती तर इस्लामच्या धार्मिक वर्चस्ववादाचे जागतिक पातळीवर लढवले गेलेले व
‘सकल इस्लाम’ या धेयाप्रद जाण्यासाठी छेडलेले एक छुपे धर्मयुद्ध होते. खिलाफत चळवळीला प्रोत्साहन देणारे व भारतात त्यासाठी आंदोलन
करणारे एकजात सारे अलि बंधू सारखे खिलाफती नेते दाखवायला काँग्रेसी पण खरे कडवे व
कट्टर धर्मांध इस्लामी धर्मगुरू होते.
त्यांनी साऱ्या देशभर मुस्लिमांना ब्रिटिशांविरोधात धर्मयुद्धाचे आवाहन केले.
त्यानंतर खिलाफतचे
नेतृत्व करणारे अली बंधू , शौकतअली सारखे आगावू नेते
शिष्टमंडळ घेवून अरबस्तानचा राजा अब्दुल अझीझ इब्नसौद याला भेटायला गेले व त्याला ‘खलिफा’ पद स्वीकारण्याची विनंती
केली. त्याला नकार देत त्या राजाने अलीबंधू व शिष्टमंडळातील इतरांना “भारतात परत
जा व आधी ब्रिटीश सत्तेपासून तुमच्या देशाला म्हणजे हिंदुस्तानला स्वतंत्र करा”
असा सल्ला दिला. त्याचा हा सल्ला मानण्यास विरोध करणाऱ्या शौकतअलीला राजाने अपमान
करीत बाहेरचा रस्ता दाखवला.
परंतु यापासून काही धडा
घेतील तर ते माथेफिरू कसले? त्यामुळे अलिबंधू प्रयत्न
न सोडता ईराणचा सत्ताधीश रेझा शाह पहलवी याला जावून भेटले पण त्यानेही
खिलाफत चळवळीबाबत काहीही रस न दाखवता अलीबंधूंची उभ्या उभ्या बोळवण केली. हे कमी
की काय म्हणून १९२१ साली महंमदअलीने अफगाणिस्तानचा अमीर अमानुल्ला याला पत्र
पाठवून हिंदुस्तानवर हल्ला करण्याचे निमंत्रण दिले व त्याला या कार्यात सर्व प्रकारे
मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्याच्या या निमंत्रणाला अमीर आमानूल्लाने
वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अशा तऱ्हेने मुस्लिम जगतातील एकाही
राष्ट्रप्रमुखाने खिलाफत चळवळीला काडीचीही सहानुभूती
दाखवली नाही. परंतु त्याच्या अगदी विपरित, हिंदुस्थानातील
मुस्लिमांनी मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विषयात विनाकारण नाक खुपसून आपल्या
देशबाह्य निष्ठांचे प्रदर्शन घडविले. दुर्दैवाने देशाच्या
स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारी काँग्रेस व गांधी, मुस्लिम तुष्टीकरण करण्याच्या नादात खिलाफत चळवळीला सक्रिय
पाठिंबा देवून बसली.
गांधींनी
ब्रिटिशांविरोधात पुकारलेल्या असहकार आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळावा व (त्यांच्या धार्मिक भावना भडकावून का होईना), त्यांना असहकार चळवळीत सहभागी करून घ्यावे या हेतूने
काँग्रेसने खिलाफत चळवळीला प्रोत्साहन दिले असे काही जणांचे मत आहे. पण त्याच
बरोबर ब्रिटिशांच्या विरोधात धर्मयुद्ध छेडणाऱ्या खिलाफत चळवळीला
बहुसंख्यांक असलेल्या भोळसट हिंदूंचा सहजगत्या पाठिंबा मिळावा म्हणून गांधींनी
असहकार चळवळ चालू केली असे काही विचारवंतांचे
म्हणणे आहे. काहीही असो, ज्या युद्धाचा भारताशी
काहीही संबंध नाही, ज्या देशाशी भारताचा
काहीही संबंध नाही, ज्या सुलतानाचा, खलीफाचा भारताशी काहीही संबंध नाही अशा गोष्टींसाठी धर्मनिरपेक्षतेचा आव आणणाऱ्या काँग्रेसने ‘सकल इस्लाम’ च्या
संकल्पनेतील ‘खलिफा’ ला पुनरुज्जीवित करण्यासाठी खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे हे
या देशासाठी व हिंदू समाजासाठी निश्चितच घातक होते. खिलाफत चळवळीच्या नावाखाली गांधींनी व काँग्रेसने भारतातील
मुस्लिमांना संघटीत होण्याची व जरूर पडल्यास धर्मासाठी संघर्ष करण्याची संधी दिली. मुस्लिम लीगने आधीच
मुस्लिमांच्या मनात द्विराष्ट्रवादाची बीजे पेरली होती त्याला खतपाणी घालण्याचे
काम या चळवळीने केले. अशा वेळी मुस्लिमांच्या मनात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण
व्हावी व हिंदुंप्रमाणे मुस्लिमांनीही आपले नेतृत्व मान्य करावे या लालसेपोटी भारतीय राजकारणात नवशिक्या असलेल्या गांधींनी ‘जशी हिंदूंसाठी गाय पूजनीय आहे, तसाच मुस्लिमांसाठी खलीफा आहे.' अशी अतिशय खोटी, फसवी व धर्मसत्ता व
राजसत्ता यांना एकाच पारड्यात तोलणारी घोषणा दिली.
या घोषणेमुळे खिलाफत
चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या मुस्लीम धर्मगुरूंनी जरी गांधीना खिलाफत चळवळीचे वरकरणी
नेतृत्व बहाल केले असले तरीही ‘गांधी एक काफीर आहेत. ते
आमचे नेते कसे होवू शकतात?’ अशी भाषा सुद्धा खिलाफत
चळवळीतील मुस्लिम नेते खुलेआम करत होते. गांधींनी जरी अहिंसेचा आग्रह धरला होता तरीही या मुस्लिम मुल्लामौलवींचा
गांधींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानावर काडी इतकाही विश्वास नव्हता व ते तसे उघडपणे
बोलूनही दाखवीत. वास्तविक पहाता गांधींची अहिंसेची कल्पना
व आग्रह फक्त हिंदू धर्मियांपुरता मर्यादित होता. तलवारीच्या जोरावर जग जिंकण्याची शिकवण देणाऱ्या , “सर तनसे जुदा” सारख्या घोषणा देणाऱ्या
इस्लामी कट्टरतवाद्यांना व अतिरेक्यांना त्यातून विशेष सुट होती. यावरून असा
निष्कर्ष निघतो की जोपर्यंत गांधींचे निर्णय
मुस्लिमांच्या हिताचे आहेत तोपर्यंत गांधी मान्य अन्यथा गांधी अमान्य अशी साधी, सोपी, सरळ व व्यावहारिक भूमिका मुस्लिम नेत्यांनी घेतली होती.
खिलाफत चळवळीला बॅरिस्टर
महमद अली जिना व डॉ. मुख्तार अहमद अंसारी सारख्या काही हाताच्या बोटावर मोजता
येतील येवढ्या नेत्यांनी विरोध नक्कीच केला होता पण गांधींच्या दुराग्रहापुढे त्यांना नमते घ्यावे
लागले. एकीकडे असे नेते मागे पडत चालले असताना, भडकावू आणि हिंसक भाषण
करणाऱ्या वहाबी मुल्लामौलवींना अफाट लोकप्रियता मिळत होती.
थोडक्यात काय तर खिलाफत
चळवळीला पाठिंबा देवून गांधी व काँग्रेसने भारतीय मुस्लिमांची मुलतत्त्ववादी विचारसरणी अधिक बळकट
करण्यास मदत केली व हिंदू समाजापुढे धोकादायक भविष्य आहे याचे संकेत दिले.
काँग्रेसच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याचे वर्णन भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी ‘गांधीवादाची सर्वात मोठी चूक’ असे करून ठेवले आहे यातच
सर्व काही आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा