राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
बुधवार, १४ मे, २०२५
मधू-रस
डॉक्टरांनी
रुजविलेल्या व गुरुजींनी फुलविलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्या मूळ विचारांना
जराही धक्का न लावता आधुनिकतेची जोड देऊन तो अधिक लोकाभिमुख करण्याचे काम संघाचे
तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी केले. बाळासाहेब केवळ द्रष्टे होते एवढेच
नव्हे तर ते अतिशय कुशल संघटक होते.
अगदी विरोधी मतांच्या नेत्यांनाही आपल्याबरोबर घेण्याचे कसब
त्यांच्याकडे होते.
त्यामुळे संघटना किती महत्त्वाची आहे याबद्दल भाष्य
करत असताना बाळासाहेब म्हणतात की “कोणत्याही
संघटनेला एक व्यक्ती कधीही वेगळी दिशा देऊ शकत नाही. तो एक सामूहिक प्रयत्न असतो.
जर एखादी व्यक्ती असा बदल करण्याचा आग्रह धरू लागली तर हुकूमशाही निर्माण होईल.
संघाला हे अभिप्रेत नाही.”
इतर सर्व सरसंघचालकांप्रमाणे
बाळासाहेब देखील आपल्या
सहकाऱ्यांना अतिशय मानसन्मान देत. तसेच काम करण्याचे स्वातंत्र्य देत. आणीबाणीच्या काळात बाळासाहेब येरवडा येथील तुरुंगात असताना एका पक्षाच्या
नेत्याने त्यांना विचारले की ‘आपण तर येथे कारागृहात आहात. तरी पण बाहेर संघाचे कार्य अतिशय व्यवस्थित रितीने कसे काय बरे चालू आहे?’ त्यावेळी बाळासाहेबांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक तर आहेत पण संघाच्या
खऱ्या संघटन शक्तीवर प्रकाश टाकणारे आहे. बाळासाहेब म्हणाले
की “त्यांनी तर केवळ एका सरसंघचालकाला अटक केली आहे. बाहेर तर चार सरसंघचालक काम करीत आहेत.” असे
बोलताना त्यांनी संघाच्या सहकार्यवाह व सहसरकार्यवाह यांची गुणवत्ता, अनुभव, अधिकार व शक्ती सरसंघ चालकांएवढीच आहे हे
दाखवून दिले.
१९ महिने आणीबाणीच्या दिवसात
तुरुंगात राहिल्यानंतर ज्यावेळी त्यांची सुटका करण्यात आली त्यावेळी क्षमाशील
बाळासाहेब म्हणाले की “सर्व काही विसरून जा व चूक
करणाऱ्यांना क्षमा करा”
समाजातील जाती व्यवस्थेवर आसूड ओढताना बाळासाहेब सांगतात की “समाज
धारणेसाठी जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्था म्हणतात ती आज अस्तित्वातच नाही. आज जे
काही आहे ती अ-व्यवस्था आहे. ती विकृती आहे. समाज धारणेशी
तिचा काहीही संबंध राहिलेला नाही.”
या संदर्भातील उपाय सांगताना बाळासाहेब म्हणतात की “जातीभेद संपविल्याशिवाय
हिंदू एकता कठीण आहे, अस्पृशता हा मानवतेला लागलेला कलंक आहे’ अस्पृश्यता
ही चूक आहे. It must go lock, stock and barrel ! ती
सर्वतोपरी गेली पाहिजे. ती संपूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था
यामुळे आपल्याला जो सामाजिक विषमतेचा अनुभव येतो तो दुःखद आहे. ही विषमता गेली
पाहिजे असा भाव आपणा सगळ्यांच्या मनात असला पाहिजे. या विषमतेमुळे समाजात विघटना
आली आहे. दुर्बलता आली आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे.”
आज हिंदू
मतांच्या ध्रुवीकरणाचे सुखद परिणाम केंद्र आणि काही राज्यात दिसत आहेत. त्याची
सुरुवात बाळासाहेबांनी केली. १९८४ च्या निवडणुकीत
त्यांनी ‘हिंदू व्होट बँक’ ची कल्पना मांडली. ४ ऑक्टोबर
१९८४ ला विजयादशमीच्या निमित्ताने दिलेल्या
भाषणात बाळासाहेब म्हणाले की, “सार्वत्रिक निवडणुका जवळ येत आहेत. या
निवडणुकीत हिंदूंनी आपले पंथ, भाषा, जाती
विषयक अभिमानाने प्रेरित न होता, राष्ट्रीय हिताच्या आधारे मतदान केले
पाहिजे. हिंदू माणसाचे मत हिंदू विरोधी व्यक्तीला कदापि मिळता कामा नये.”
आपल्याला कोणत्या प्रकारची सामाजिक व्यवस्था हवी आहे
हे विशद करताना बाळासाहेब म्हणतात की “जेव्हा जेव्हा सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील बदलाचा विषय येतो तेव्हा
आपले दृष्टिकोन सर्वे भवन्तु सुखिनः,
सर्वे सन्तु निरामयाः असा असावा. याचा अर्थ असा की
प्रत्येकजण आनंदी असावा, प्रत्येकजण
निरोगी असावा, प्रत्येकजण निरोगी असावा. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. हे सुभाषित आपल्या सामाजिक-आर्थिक विचारसरणीचा आधार आहे. शोषणमुक्त आणि
समानतेने परिपूर्ण अशी सामाजिक-आर्थिक व्यवस्था आपल्याला हवी आहे”.
संघ शाखेचा उद्देश स्पष्ट करताना बाळासाहेब म्हणतात
की “संघाची शाखा ही केवळ खेळ
खेळण्याचे किंवा परेड आयोजित करण्याचे ठिकाण नाही, तर ती
सज्जनांच्या सुरक्षेचे एक अघोषित मिळविण्यासाठी वचन आहे. तरुणांना वाईट व्यसनांपासून मुक्त ठेवणारे हे
एक संस्कारपीठ आहे.
समाजावर अचानक आलेल्या संकटाच्या वेळी ताबडतोब व अप पर भाव न बाळगता मदत मिळविण्यासाठी चे
हे आशेचे केंद्र आहे. हे महिलांच्या निर्भयतेचे व त्यांच्या प्रति सुसंस्कृत वर्तनाचे आश्वासन आहे. ही राष्ट्रविरोधी शक्तींना आपल्या वर्चस्वाखाली ठेवणारी शक्ती
आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एक असे विद्यापीठ आहे जे
समाजाच्या विविध क्षेत्रात संस्कारक्षम व सुसंस्कृत नागरिक उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देते”
‘हेल्प युवर सेल्फ’ म्हणजे आपणच आपल्याला
मदत करण्याची गरज आहे. आपले संरक्षण करण्यासाठी
आपल्यालाच बलवान व संघटित होण्याची गरज आहे
हे स्पष्ट करताना बाळासाहेब म्हणतात की “संघाला हिंदू समाजाला सक्षम बनवायचे आहे. संघाची इच्छा आहे की ही शक्ती नैसर्गिकपणे समाजात नेहमीच अस्तित्वात राहावी. समाजाला नेहमीच कोणत्यातरी
एखाद्या बाहेरच्या संस्थे वा संघटनेकडून संरक्षण दिले जाते हे योग्य नाही. समाजाने
नेहमीच आपल्या सर्व समस्या स्वतःहून सोडवल्या पाहिजेत. संघ अशा नैसर्गिक शक्तीला
जागृत करत आहे”.
डॉक्टर आणि गुरुजींचा प्रत्यक्ष सहभाग लाभलेले व
त्यांच्या मुशीत तयार झालेले बाळासाहेब देवरस यांना त्यांच्या कुशल संघटन
कौशल्याच्या जोडीला प्रखर बुद्धिमत्तेची व दूरदृष्टीची
साथ लाभली व त्यामुळे त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाने उत्तुंग झेप घेतली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा