राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, १४ मे, २०२५

 

विश्व हिंदू परिषद



अनादि मी अनंत मी अवध्य मी भला |

मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ||

 

या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या कवितेत ज्याला मी असे म्हटले आहे तो म्हणजे हिंदू अर्थात सनातन धर्म. हिंदू हा सनातन आहे. म्हणजेच ज्याला आदि नाही, अंत नाही असा. अनादी कालापासून चालत आलेला आणि अनंत काळापर्यंत चालणारा असा. या धर्मामध्ये रामाचे चारित्र्य, श्रीकृष्णाचे ज्ञान, बुद्धाची करुणा, महावीरांची तपस्या, ज्ञानेश्वरांची ममता, बसवेश्वरांची समता तर गुरु गोविंद सिंहांच्या च्या शौर्याची गाथा आहे.  यामुळेच की काय एकेकाळी हा धर्म जगभर पसरला होता आणि आजही भारतासह अनेक देशात सनातनी हिंदू मोठ्या प्रमाणात राहत आहेत.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्षेत्र हे हिंदुस्थानातील हिंदूंना संघटित करण्याएवढेच मर्यादित असल्यामुळे जगभर पसरलेल्या हिंदूंना जागतिक स्तरावर संघटित करावे व त्यांच्यामध्ये सनातन धर्माबद्दलची आस्था वाढवावी तसेच अब्राहमिक धर्माच्या जागतिक धर्मांतराच्या कार्यक्रमाला उत्तर द्यावे असे काही संघ स्वयंसेवकांना वाटू लागले. याचबरोबर अनेक पंथ, सांप्रदाय, वेगवेगळी पीठे, आखाडे, आश्रम यांचे नेतृत्व करणाऱ्या साधुसंतांना एकत्र करून सनातन हिंदू धर्माबद्दल एकवाक्यता निर्माण करणे याचीही गरज वाटू लागली.  आक्रमकांच्या काळात सनातन हिंदू धर्मावर तसे त्यांच्या पूजास्थानावर प्रचंड मोठे हल्ले झाले व ही पूजास्थाने पाडण्यात आली. अशावेळी हिंदू अस्मितेला जिथे ठेच लागली होती त्यावर उपाय शोधणे सुद्धा गरजेचे होते. या सर्वातूनच वरिष्ठ स्वयंसेवक शिवराम शंकर तथा  दादासाहेब आपटे  यांनी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिनी २९ ऑगस्ट १९६४  रोजी चिन्मय मिशनचे स्वामी चिन्मयानंद यांच्या अध्यक्षतेखाली विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. दादासाहेब आपटे हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक आणि पहिले सरचिटणीस म्हणून ओळखले जातात. 

 

आरोग्य-शिक्षण, इत्यादी क्षेत्रात ४२७७ हून अधिक सेवा प्रकल्पांद्वारे विहिंप हिंदू समाजाची मुळे मजबूत करत आहे. हिंदू समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींचे उच्चाटन करण्यासाठी, समाजाला जातीमुक्त करण्यासाठी आणि जाती विरहित हिंदू ऐक्य पुनरुज्जीवित करण्यासाठी विहिंप सतत प्रयत्न करत आहे.

 

आपल्या मूळ मूल्यांचे, श्रद्धांचे आणि पवित्र परंपरांचे रक्षण करण्यासाठी, विहिंप श्री अमरनाथ यात्रा, श्री राम सेतू, श्री गंगा रक्षा, गौ रक्षा, हिंदू मठ-मंदिराचा मुद्दा, ख्रिश्चन चर्चकडून हिंदूंचे धर्मांतर, इस्लामिक दहशतवाद, बांगलादेशी मुस्लिम घुसखोरी अशा अनेक मुद्द्यांवर काम करीत असून विहिंप हिंदू समाजाची संघटित  शक्ती आहे. हिंदू धर्मातील सर्व पंथांच्या धार्मिक नेत्यांचा एकाच व्यासपीठावर मेळावा, विविध सेवा प्रकल्पांची स्थापना करणे, सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन करणे, समाजात हिंदू अभिमान आणि कता वाढवणे, बळजबरीने किंवा अमिष दाखवून फसवून धर्मांतरण केल्या गेलेल्या हिंदूंची घरवापसी करणे अशी महत्वाची कार्ये विहिंप करीत आहे.


आज भारतासहित नेपाळ भूतान, यूएसए, कॅनडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम, युनायटेड किंग्डम, जर्मनी, नॉर्वे, नेदरलँड्स, केनिया, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सिंगापूर, इंडोनेशिया, हाँगकाँग, तैवान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आदी १०० हून अधिक देशात विहिंप हिंदू संघटनेचे काम करीत आहे.

 

पूर्वीच्या काळी हिंदूंच्या नियमित संमेलनांची एक परंपरा होती. त्या काळी अनेक ऋषींचे आश्रम असायचे.  हे ऋषी जरी अनेक विषय जाणायचे तरी खास करून एखाद्या विशिष्ट विषयात अधिक रुची ठेवायचे. त्यांचा आश्रम म्हणजे एक प्रयोगशाळाच होती.  तसं ते एक विद्यापीठ देखील होतं.  या आश्रमात साहित्यव्याकरणसंगीतकलाधर्मसंस्कृतीराजकारणअर्थकारणयुद्धकलाशस्त्र - अस्त्र निर्मितीविज्ञान, औषध शास्त्र,  चिकित्सा शास्त्र,  खगोल विज्ञान, दी असंख्य विषयांवर सातत्याने संशोधन चालू असायचंआणि या संशोधनातून जो निष्कर्ष निघायचा तो वेदांमध्ये समाविष्ट व्हायचाअशा रीतीने वेदांच्या ऋचा वाढत गेल्या.

 

दर बारा वर्षानंतर होणाऱ्या ‘प्रयागराज मधील कुंभात तसेच ‘उज्जैन’ ‘नाशिक    हरीद्वार  येथील लघु कुंभात हे सारे तपस्वीऋषीमुनी एकत्र यायचे आणि त्यावेळी त्यांच्या आश्रमात म्हणजेच प्रयोगशाळेत जे निष्कर्ष निघाले  त्यांचे सादरीकरण म्हणजेच आजच्या भाषेत प्रेझेंटेशन व्हायचे.  यावर सांगोपांग चर्चा व्हायची.  अनेक प्रश्न आणि उपप्रश्न विचारले जायचे.  प्रबंध सादर करणाऱ्या ऋषीला या साऱ्या प्रश्नांची  पटतील अशी उत्तरे द्यावी लागायचीआणि एकदा का निष्कर्ष सर्वांना मान्य झाला की त्याचे रूपांतर संस्कृत ऋचे व्हायचे  व नंतरच ही ऋचा चार वेदांपैकी जो त्या विषयाला अनुरूप असेल अशा वेदात समाविष्ट व्हायची. अशा प्रकारे हिंदू राजांच्या उदार आश्रयाखाली हिंदूंची संमेलने नियमित पणे कुंभाच्या निमित्ताने होत असत. मध्यंतरीच्या काळात विशेषत: परकीय आक्रमकांचे राज्य असताना ही प्रथा बरीच मागे पडली होती विहिंप ने ही प्रथा केवळ पुनरुज्जीवितच केली असे नाही तर त्या परंपरेला जागतिक रूप दिले व जागतिक स्तरावर हिंदूंना एकत्र करण्यासाठी अनेक संमेलनाचे यशस्वी आयोजन केले.


विहिंप तर्फे पहिले विश्व हिंदू संमेलन मौनी अमावस्येला २२, २३ आणि २४ जानेवारी १९६६ ला  महाकुंभमेळ्या प्रसंगी प्रयागराज येथे आयोजित केले होते. या संमेलनात २५,००० प्रतिनिधींची राहण्याची व्यवस्था होती आणि ५०,००० प्रतिनिधी बसू शकतील अशी मुख्य मंडपाची क्षमता होती. सुमारे ७५,००० प्रतिनिधींनी संमेलनाच्या चर्चासत्रात भाग घेतला. परिषदेची विचारसरणी, ध्येय आणि कार्यपद्धती पहिल्यांदाच हिंदू समाजासमोर या संमेलनाद्वारे जगासमोर आली.

 

विहिंप तर्फे दूसरे विश्व हिंदू संमेलन २५, २६ आणि २७ जानेवारी १९७९ रोजी गंगा, यमुना आणि बुद्धी- सरस्वती यांच्या संगमावर प्रयागराज येथे खास उभारलेल्या महर्षी वेदव्यास महानगरमध्ये संपन्न झाले. याच्या आदल्या दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९७९ रोजी विहिंप च्या पुढाकाराने  विश्व संस्कृत संमेलन ही  आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला उपस्थित असलेल्या ५०,००० हून अधिक प्रतिनिधींसाठी निवास व्यवस्था संमेलनाच्या ठिकाणीच करण्यात आली होती. सुमारे १२० एकर जमिनीच्या विस्तीर्ण क्षेत्रात १९ तंबू टाउनशिप उभारण्यात आल्या होत्या. प्रत्येक टाउनशिपमध्ये सुमारे ३,००० प्रतिनिधींसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या संमेलनात एकूण १८ देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता तर विहिंप तर्फे तिसरे विश्व हिंदू संमेलन ११ ते १३ फेब्रुवारी २००७ दरम्यान प्रयागराज येथे त्रिवेणी संगमापासून थोड्या अंतरावर आयोजित करण्यात आले होते.

 

श्री राम जन्मभूमी मुक्तीच्या लढ्यामध्ये विहिंप ने अग्रभागी राहून आंदोलन उभारले होते व लढा दिला होता.  हजारो हिंदू वीरांचे बलिदान देऊन न्यायालयीन लढा लढून पावणे पाचशे वर्षांपूर्वी अयोध्येतील ज्या रामलल्लाचे मंदिर मुघलांनी उध्वस्त केले होते त्याच ठिकाणी जगाला हेवा वाटेल वाटावा एवढे देखणे मंदिर विहिंप च्या अथक प्रयत्नांनीच निर्माण झाले या संपूर्ण लढ्याचा इतिहास या आधीच माझ्या सात लेखातून मी विस्ताराने वर्णन केला आहे यावरून विहिंप च्या ताकदीची कल्पना येते. विहिंप च्या अंतर्गत तरुणांसाठी बजरंग दल तर महिलांसाठी दुर्गा वाहिनी या आणखीन दोन संघटनांची संघटना आपापल्या क्षेत्रात काम करीत आहेत जिथे जिथे हिंदूंवर अन्याय होतो तिथे तिथे विहिंप, बजरंग दल व दुर्गा वाहिनी हिंदू हितासाठी ठामपणे उभ्या राहतात व हिंदूंना बळ देण्याचे काम करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा