राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १२ मे, २०२५
वनवासी कल्याण आश्रम
हिंदू आई-वडिलांच्या पोटी
जन्माला आलेला तो हिंदू. त्यामुळे हजारो वर्षाचा इतिहास
असलेल्या सनातन संस्कृतीमध्ये धर्मांतराचा इतिहास नाही. परंतु त्याच्या अगदी उलट, अब्राहमिक धर्मात म्हणजेच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात, धर्मांतर ही अतिशय महत्त्वाची बाब मानली आहे आणि इतर धर्मातील लोकांना
साम, दाम, दंड,
भेद वापरून आपल्या धर्मात आणायचं हे त्या धर्मातील धर्माचाऱ्यांना आपलं जीवित
कार्य वाटतं.
मुस्लिम आक्रमकांनी
क्रूरतेने भयंकर छळ, बलात्कार करून दहशतीने
करोडो हिंदूंचे धर्मांतर केले. ख्रिश्चनांनी हे तर केलेच पण फसवून, अमिष दाखवून धर्मांतर केले व करत आहेत. अडाणी
पोर्तुगीजांनी गोवा, दिव, दमण, वसई येथे क्रूरतेची परिसीमा गाठत हिंदूंचे धर्मांतर केले हा इतिहास आहे. पण आजही स्वतंत्र भारतात परदेशी पैशावर पोसलेले चर्च, पैशाचा लोभ दाखवून गरीब आदिवासी व दलित बांधवांचे धर्मांतर करीत आहेत. आदिवासी
बांधवांच्या भोळेपणाचा, गरिबीचा व अज्ञानाचा फायदा घेत हे धर्मांतर आजही अगदी जोरात चालू आहे. आदिवासी बहुल ईशान्य भारतात, चर्चने ९५% हिंदूंचे धर्मांतरण केले आहे.
ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या या
कामांमध्ये त्यांना इहवादी व नास्तिक लोकांची प्रचंड मदत झाली. आदिवासी भागामध्ये,
विशेषतः निबिड जंगलात माओवाद्यांच्या
कारवाया सुरू असतात. या माओवाद्यांची ढाल करून, त्यांना पैसे, शस्त्रे व इतर सामग्री पुरवून, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचा ‘कव्हर’ म्हणून उपयोग केला व या ‘कव्हर’ खाली त्यांनी गरीब व भोळ्या आदिवासींना भूलथापा देऊन, अमिष दाखवून, फसवून त्यांचे धर्मांतरण केले. जिथे
जंगल आहे, तिथे आदिवासी आहेत, तिथे
माओवादी आहेत, तिथे ख्रिश्चन मिशनरी आहेत आणि अगदी तिथेच
धर्मांतराचे काम अगदी जोरात चालू आहे. हा निश्चितच योगायोग
नाही.
सनातन धर्माच्या विरोधात
असलेल्या काँग्रेसने देखील अशा धर्मांतराकडे जाणून बुजून कानाडोळा केला. किंबहुना मदर टेरेसा सारख्या ख्रिश्चन मिशनरी महिलेला तिच्या
धर्मांतराच्या कार्याची पोचपावती म्हणून ‘भारतरत्न’ हा किताब देऊन भारतातील ख्रिश्चन धर्मांतराला काँग्रेस सरकारने एक
प्रकारे प्रोत्साहनच दिले.
दुसरं सहस्रक संपल्यानंतर
कॅथलिक धर्मगुरूंनी म्हणजेच पोपने एका संदेशात म्हटले आहे की ‘पहिले सहस्रक युरोपला ख्रिश्चन बनविण्याचे, दुसरे
सहस्रक आफ्रिकेला ख्रिश्चन बनविण्याचे तर तिसरे सहस्रक हे संपूर्ण आशियाला ख्रिश्चन
बनविण्याचे असेल’. यावरून या
ख्रिश्चन मिशनऱ्यांचा संपूर्ण आशिया हा ख्रिश्चन करण्याचा डाव आहे हे त्यांनीच
उघडपणे सांगून टाकले आहे.
शेकडो वर्षे भारताला अगदी शक, कुशण, मंगोल, अफगाण, मुघल, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज आदी आक्रमकांनी
फक्त लुटले. त्यामुळे स्वतंत्र झाल्यानंतरही हा देश पूर्णपणे कफल्लक झाला होता. अशावेळी पैशाअभावी आदिवासी क्षेत्रांमध्ये सेवा-सुविधा
पुरवणं सरकारला शक्य नव्हतं. औषध तर सोडाच पण खायला
अन्न नसल्यामुळे आदिवासी बांधवांना उपासमारीची पाळी यायची.
अशावेळी अगदी एक किलो तांदूळ देवून सुद्धा आदिवासी बांधवांना धर्मांतर करण्यास भाग
पाडण्यात आलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
काही ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आदिवासी भागामध्ये काम
करून हे धर्मांतर थांबवण्याची गरज भासली. त्याचवेळी
मध्यप्रदेशच्या जशपूर भागात शासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या बाळासाहेब
देशपांडे यांनी गांवागांवातील फादरची दहशत मोडून वनवासी बंधूंना संघटित करण्याचे
काम केले. १९५२ साली अमृतलाल विठ्ठलदास तथा ठक्कर
बाप्पा
यांच्या संकल्पनेतून व ‘वनयोगी’ रमाकांत
केशव तथा बाळासाहेब देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली “नगरवासी, ग्रामवासी, वनवासी, हम सब भारतवासी” या ब्रीदवाक्याने वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना
करण्यात आली.
मध्य प्रांत
सरकारने न्यायाधीश भवानी शंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली नियोगी कमिशन नियुक्त
केले व या कमिशनने क्रिश्चियन मिशन सेवेच्या नावाने धर्मांतरण कसे करते याचा
ऐतिहासिक अहवालाने मिशनरी चेहरा जगासमोर आणला. एवढेच नव्हे तर रांची विमानतळावर
धर्मांतरासाठी पोप आले असतांनाच 'पोप गो बॅक' साठी
केलेलं आंदोलन हे आश्रमाच्या कार्यातील एक मैलाचा दगड आहे. केवळ जनजाती बांधव हेच मूलनिवासी असा भेद युनायटेड नेशन्सद्वारे
पसरवण्याचा प्रयत्न बाळासाहेब देशपांडे यांच्या दूरदृष्टीने ओळखला व भारतातील सर्व
लोक हे मूल निवासी आहेत यासाठी तत्कालीन नरसिंहराव यांना ज्ञापनपत्र दिले. आश्रमाचीच भूमिका भारताने युनायटेड नेशन्स मध्ये मांडली.
सामाजिक एकात्मतेद्वारे नागरी व आदिवासी बांधवांमधील दरी
दूर करणे, आदिवासींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण पद्धतीद्वारे
शिक्षित करणे, आरोग्यसेवा उपलब्ध नाहीत अशा भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून
देणे, त्यांच्या पारंपारिक खेळांमध्ये
विशेष प्राविण्य मिळवून देण्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध
करून देणे, त्यांच्या
पारंपारिक उपजीविकेच्या क्षेत्रात त्यांचे कौशल्य वाढवून त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती करणे, आदिवासींना त्यांच्या संवैधानिक
हक्कांबद्दल, उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांबद्दल जागरूक करून
त्याचा लाभ मिळवून देण्याचा व त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करणे, महिलांना
सक्षम करणे हे आश्रमाचे ध्येय आहे.
आदिवासी भागात प्रत्यक्ष जाऊन, तेथील अडीअडचणी समजावून घेऊन आदिवासी बांधवांना त्यांचा स्वतःचा हिंदू धर्म, संस्कृती समजावणे, त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत
आलेल्या संस्कृतीची त्यांनाच नव्याने ओळख करून देणे, पुरेसे
अन्नधान्य औषधे पुरविणे, मुलांना आधुनिक शिक्षणाशी ओळख करून
देणे व आश्रमशाळा, शाळा सुरू करणे. कुपोषणाशी झुंजणाऱ्या बालकांना पोषक आहार पुरवून बालमृत्यूचे प्रमाण कमी
करणे, पाण्याचा तुटवडा आहे तिथे बोअरवेल व विहिरीची व्यवस्था
करून त्यांना चांगले पाणी उपलब्ध करून देणे, मंदिरे
बांधणे, आदिवासी बांधवांचे सामुदायिक विवाह लावणे अशा अनेक
गोष्टी आश्रमातर्फे करण्यात येतात. गेली ७३ वर्षे आदिवासी क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे याच
क्षेत्रात आता आदिवासी बांधवांची मुले स्वतःहून आश्रमाचे काम करू लागली आहेत. त्यातील कित्येक जण डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक, चार्टर्ड अकाउंटंट तसेच गावचे सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार व
काही अगदी मंत्री देखील झाले आहेत व आपापल्या परीने योगदानही देत आहेत. आश्रमातर्फे
देशभरातील ६३,९२६ गावांमध्ये २१,८२९ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामुळे १२,३,७१९७ आदिवासीना लाभ मिळाला आहे. या लाभार्थ्यांमध्ये १,११,३२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १०,८२,८३९ आदिवासी बंधू-भगिनींना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाला आहे. आश्रमांची २१६ शिक्षण केंद्रे असून त्यात १५७ प्राथमिक व ५६ माध्यमिक
विद्यालये आहेत. या शाळांमध्ये ३२,७४४ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थी-विद्यार्थिनींची
निवासाची व्यवस्था करण्यासाठी आश्रमातर्फे मुलांसाठी १७५ तर
मुलींसाठी ५२ वसतिगृहे
बांधण्यात आली असून त्यामध्ये ५,७५६ विद्यार्थी व २,२०७ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत आश्रमाने अनेक मंदिरे उभारली असून
आदिवासी बांधवातून कथाकार, कीर्तनकार व प्रवचनकार निर्माण
व्हावेत यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे.
आश्रमाच्या निःस्वार्थ सेवेने
ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला अंकुश लावला गेला आहे. एवढच नव्हे तर धर्मांतर केलेले कित्येक आदिवासी आता घरवापसी करीत आहेत.
त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी आश्रम, संघ व भाजप
यांना टोकाचा विरोध करीत आहे आहेत. भाजपने आपल्या दहा
वर्षाच्या कारकिर्दीत आदिवासी भागात जे काम केले ते काँग्रेसने त्यांच्या पन्नास
वर्षाच्या कारकिर्दीतही केले नाही. जर ख्रिश्चन मिशनऱ्यांना आदिवासी
बांधवांच्या फक्त कल्याणातच रस
असता तर त्यांनी भाजपच्या या चांगल्या कामाला पाठिंबा
द्यायला हवा होता. परंतु आदिवासी बांधवांच्या हिताच्या
विरुद्ध निर्णय घेणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा देणारे हे ख्रिश्चन मिशनरी, आदिवासी बांधवांचे हित जपत नसून त्यांना
फक्त त्यांच्या गरिबीचा फायदा उचलून त्यांचे धर्मांतर करण्यातच रस आहे. यावरून ‘वनवासी कल्याण आश्रमाची’ आजही किती गरज आहे हे
लक्षात येते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा