राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५
गांधी हत्या आणि संघ –
पार्श्वभूमी
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश
स्वतंत्र होत असताना अखंड हिंदुस्तानचे अनेक भागात तुकडे झाले. ब्रिटिशांनी तोडा-फोडा-झोडा ही नीती वापरत संपूर्ण सिंध प्रांत व अर्ध्याहून अधिक पंजाब भारतातून
अलग केला व पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण केले.
त्याच्या जोडीला बंगालचा अर्ध्याहून अधिक भाग पाकिस्तानला दिला. फाळणीच्या दिवसात
हिंदुस्थानात प्रचंड मोठे जातीय दंगे झाले. ज्यात हिंदूंची
अपरिमित प्राण व वित्तहानी झाली. पाकिस्तानातील बहुसंख्यांक
मुस्लिमांनी तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांचे मुडदे पाडले. त्यांची संपत्ती लुटली. महिलांवर बलात्कार केला. त्यामुळे तेथील हिंदूंना आपले घरदार सोडून भारतामध्ये आश्रय घेण्याशिवाय
कुठलाही पर्याय राहिला नव्हता.
जगाच्या इतिहासातील
सर्वात मोठे मानवी स्थलांतर या काळाने पाहिले. ज्याची सल प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. त्याचवेळी गांधीजींनी पाकिस्तानला नुकसान भरपाई म्हणून ५५ कोटी रुपये द्यावेत असा आग्रह धरला. या रकमेची सोन्याच्या भावाने तुलना केली
असता आजची रक्कम ४५,००० कोटी एवढी प्रचंड होते. गरीब हिंदुस्थानाला ही रक्कम परवडणारी
नव्हती. एवढेच नव्हे तर शत्रुराष्ट्र पाकिस्तानला एवढी रक्कम
देऊन त्याला बलशाली बनवणे हे आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारण्याजोगे होते. अंध गांधीभक्तांखेरीज हे कोणालाही पटणारे नव्हते.
फाळणी संदर्भात देशात दोन टोकाचे मतप्रवाह होते. त्यावेळी
काँग्रेसचे नेतृत्व गांधीजींकडे होते. सुरुवातीला गांधीजी जरी फाळणीच्या विरोधात होते तरी शेवटी त्यांनी फाळणी मान्य केली. त्यामुळे देशाच्या फाळणीला गांधीजीच जबाबदार आहेत असा बहुतेकांचा समज
होता. यामुळे गांधीजींना ‘महात्मा’ म्हणणारे लोक देखील गांधीजींचा विरोध करू लागले होते. या विरोधातूनच ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या पत्रकार, संपादक तरुणाने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली. गांधीहत्येची बातमी जेव्हा गुरुजींना कळली
त्यावेळी त्यांच्या मुखातून ‘ही केवळ अमानुष कृती आहे’
अशी पहिली प्रतिक्रिया निघाली. ज्यावेळी त्यांना गांधीजींवर
गोळ्या चालविणाऱ्याचे नाव कळले त्यावेळी या दूरदृष्टी असलेल्या ऋषितुल्य
सरसंघचालकांनी ‘संघकार्य वीस वर्षांनी मागे गेले’ असे उद्गार काढले.
संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला हादरविणारी ही घटना होती. तिचे पडसाद अगदी आजही उमटत आहेत. एक गोष्ट
सत्य की देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती. कट्टर
इस्लाम पंथीयांनी देश स्वतंत्र होण्याआधीच ही मागणी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी सशस्त्र उठाव करून, जमल्यास, हिंदूंची संपूर्ण कत्तल करण्याची तयारी देखील करून ठेवली होती. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक भागात तसे प्रयत्न देखील करण्यात आले होते.
त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू सुद्धा त्याला विरोध करण्यासाठी व
आपला जीव वाचावा या उद्देशाने आपल्या परीने प्रतिक्रिया देत होते. नथुराम गोडसे हे त्यापैकीच एक होते.
३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची
हत्या झाली. नेहरूजींच्या
इको सिस्टीमने ‘गांधीहत्तेला संघ जबाबदार आहे’ अशी आवई उठवली. काँग्रेसवाल्यांना एकत्र येवून
संघावर हल्ला करण्यास एक दिवस लागला. १ फेब्रुवारी १९४८ रोजी
गुरुजींच्या घरासमोर हल्ला करण्यासाठी हजारो काँग्रेसवाले
जमा झाले. अहिंसेचे पुजारी म्हणविणाऱ्या गांधीजींचे
सशस्त्र व हिंसक भक्त गुरुजींना ठार
मारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले. त्यावेळी पोलिसांनी गुरुजींना तेथून दूर जाण्याचा सल्ला दिला. गुरुजींनी हा सल्ला नम्रपणे नाकारून ‘आहे त्याच घरात राहण्याचा’ धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी ते म्हणाले की ‘ज्या समाजासाठी मी कार्य करीत आहे त्या समाजालाच जर मी नको असेन तर मी
कुठे जाऊ? जे व्हायचं ते होऊ दे’.
सुदैवाने पोलिसांनी बळाचा वापर करून हल्लेखोरांना दूर केले
व गुरुजींचा जीव वाचला. पण त्याच रात्री गांधीहत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर लागलेले आरोप वाचून गुरुजी म्हणाले ‘संशयाचं
हे धुकं दूर होईल आणि या अग्निपर्वातुन
निष्कलंक होऊन आपण सारे जण बाहेर येऊ’. एवढा दुर्दम्य
आत्मविश्वास व आपण न केलेल्या कृत्याबद्दल अविचलित राहून शांतपणे पोलीस कारवाईला सामोरे
जाण्याचं धैर्य गुरुजींनी दाखवलं.
वास्तविक पाहता संघाला त्यावेळी कोणतीही लिखित घटना नव्हती. संघ स्वयंसेवक बनण्यासाठी कोणतीही नोंदणीची
पद्धत नव्हती. संघ स्वयंसेवकांचा रेकॉर्ड नव्हता. संघात प्रवेश करताना कोणतीही फी घेतली जात नव्हती.
संघात प्रवेश करायचा म्हणजे ‘खुल्या मैदानात, दरवाजा-खिडकी नसलेल्या शाखेमध्ये दाखल व्हायचे व जेव्हा
जावे वाटेल त्या दिवशी जायचे’ अशी पद्धत होती. त्यामुळे
नथुराम गोडसे हे संघाचे स्वयंसेवक होते या विरोधकांच्या मूळ आरोपात काहीही तथ्य
नसल्यामुळे ते सिद्धच होऊ शकत नव्हते. तरीही स्वतः बद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना बाळगणारे, एक अतार्किक, अव्यवहार्य व वस्तुस्थितीपासून कोसो दूर असलेली विचारधारा असलेले, पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे हेकेखोर, हट्टी नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांचा, सर्वांनाच माहीत असलेल्या कारणामुळे, संघावर राग
होता. एवढेच नव्हे तर ते संघाचा द्वेष करत. मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही हट्टापायी, संघावरील वैयक्तिक रागापायी, त्यांनी गांधीहत्येची संधी साधत २ फेब्रुवारी १९४८ रोजी केंद्रशासित प्रदेशात व ४ फेब्रुवारी १९४८ रोजी देशभर
संघावर बंदी घातली. १७ हजाराहून अधिक संघ
स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. ‘दंगे करणे व लुटमार करणे’
यासारखे तद्दन खोटे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. परंतु या
निराधार आरोपांविरुद्ध संघ स्वयंसेवकांनी न्यायालयाचे
दरवाजे ठोठावले व केवळ ४५ दिवसातच सरकारने केलेली अटक न्यायालयाने
घटनाबाह्य व अतार्कीक ठरवत त्या सर्वांना निर्दोष मुक्त केले. नेहरु व त्यांचे चेले-चपाटे तोंडावर आपटले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा