राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५
मोगरा फुलला
१९२५ साली स्थापन झालेल्या
संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीतील चौथा टप्पा व सद्य कालखंड हा
हिंदुराष्ट्र बनविण्याच्या संघाच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचताना वाढलेल्या
जबाबदारीच्या जाणिवेचा
आहे. २००९ पासूनचा आजतागायत १५
वर्षांचा हा चौथा टप्पा डॉ. मोहनराव
भागवतांच्या नेतृत्वाचा वर्तमान कालखंड आहे. या चौथ्या टप्प्यातच भारताला
विश्वगुरू बनविण्यासाठी विकासाच्या माध्यमातून जनमत संघटीत करणे व संघाला त्याच्या अंतिम
ध्येयाकडे नेणे हे शक्य आहे.
डॉ. मोहनराव भागवत यांनी सरसंघचालक
पदाची सूत्रे २००९ साली
हाती घेतली व त्यांच्या जोडीला सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांची सरकार्यवाह
म्हणून निवड करण्यात आली.
यावर्षी संघाच्या पुढाकाराने व सक्रिय सहभागाने ‘गो-संवर्धन व ग्राम केंद्रित शेती’ याचे महत्त्व लोकांना कळावे
म्हणून महत्त्वाच्या साधू-संतांचा सहभाग असलेली ‘विश्वमंगल
गौ-ग्राम यात्रा’ काढण्यात आली.
२३ हजार
३००
गावांमध्ये संपर्क अभियान
राबविण्यात आले.
यात ११ लाखाहूनही अधिक लोकांनी सहभाग घेतला.
२०१ खासदारांनी व ८६७ आमदारांनी आमदारांनी या महत्त्वपूर्ण
अभियानाला आपला लिखित पाठिंबा दिला.
या यात्रेच्या व उद्दिष्टांच्या समर्थनार्थ आठ कोटी ३४ लाख नागरिकांच्या सह्या गोळा
करण्यात आल्या.
यात ७५ हजाराहून अधिक ख्रिश्चन व
सुमारे अकरा लाख मुस्लिम बांधवांच्या पाठिंब्याचा वाटा आहे. या यात्रेच्या समर्थनार्थ
विविध ठिकाणी स्थानिक स्वरूपात,
सुमारे सव्वा लाख केंद्रात,
अशाच प्रकारच्या यात्रा काढण्यात आल्या ज्यात
सुमारे दीड कोटी नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.
९२७१ पूर्णवेळ
स्वयंसेवकांनी व त्यांच्या जोडीला एक लाख ४१ हजार ३५ संघ स्वयंसेवकांनी एकत्रित असे सुमारे २६००० किलोमीटरचे अंतर कापले. २८ सप्टेंबर २००९ रोजी हरियाणा मधील कुरुक्षेत्र येथून
सुरू झालेली विश्वमंगल गौ-ग्रामयात्रा
यात्रेची सांगता १७ जानेवारी
२०१० रोजी
महाराष्ट्रातील नागपूर येथे म्हणजेच संघाच्या मुख्यालयाच्या शहरात झाली.
२०१० साली उत्तर कर्नाटकात आलेल्या
पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते.
अशावेळी सुमारे २४०० संघ
स्वयंसेवकांनी १८० गावात
मदत साहित्याचे वाटप केले.
संघाचीच एक संस्था असलेल्या ‘सेवा
भारती’ ने ९ गावात १६८० घरे बांधून पुरामध्ये विस्थापित
झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन केले.
याच वर्षी सरसंघचालक डॉ.
मोहनराव भागवत यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ठिकठिकाणी मोहनरावांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याला
संपूर्ण गणवेशात संघस्वयंसेवक उपस्थित राहत.
केरळ, मंगलोर आधी भारताच्या दक्षिण
भागात तर पूर्ण गणवेशातील संघ स्वयंसेवकांची उपस्थिती ९० हजारापर्यंत पोहोचली होती
याला उत्तरेकडील महाकौशल
सारखा विभागही अपवाद नव्हता. २०११ साली
हिंदू समाजाला भेडसावणारे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी व हिंदू
समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मा
नर्मदा सामाजिक कुंभ’
या उत्सवाचे मंदाला येथे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवात ३३६ जिल्ह्यातील ११७९ तालुक्यातील ४००० हून अधिक गावातील विविध जाती-जमातीतील नागरिक उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे यात ४१५ वेगवेगळ्या अनुसूचित जाती-जमातींनी
आपला सहभाग नोंदवला होता.
तीन दिवस चाललेल्या या उत्सवात तीस लाखाहून अधिक भाविकांनी श्रद्धापूर्वक भाग घेतला होता.
२०१३ साली
‘हिंदू योद्धा’ असे ज्यांचे वर्णन करतात व
ज्यांनी हिंदू धर्माची महती साऱ्या विश्वापुढे मांडली असे महान तत्त्वचिंतक व
विचारवंत स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या
जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या बॅनर खाली व संघाच्या सहभागाने देशभरात अनेक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वामी विवेकानंदांचे विचार पोहोचविण्यासाठी
विवेकानंद केंद्राने या कार्यक्रमात गायत्री परिवार,
रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, स्वामी नारायण सांप्रदाय, विविध जैन संघटना यांना सहभागी
करून घेतले. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात
समाजाच्या सर्व क्षेत्रातील विचारवंत,
बुद्धिजीवी, पत्रकार, वैज्ञानिक, संरक्षण दलातील अधिकारी, सेवानिवृत्त न्यायमूर्ती व
शिक्षणतज्ञ यांनी उत्साहाने भाग घेऊन आपापले विचार व्यक्त केले व संघकार्याची
प्रशंसा केली.
दुर्दैवाने याच वर्षी उत्तराखंडमध्ये
चार धाम यात्रेदरम्यान अतिशय भयंकर अशी नैसर्गिक आपत्ती ओढवली. नेहमीप्रमाणेच संघाने त्वरितच
आपले बचाव कार्य सुरू केले आपले कर्तव्य चोखपणे बजावले. २०१६ साली आधुनिक समाजाला योग्य
असा गणवेशात बदल करण्याचा निर्णय संघाने घेतला.
९० वर्षापासून
संघाच्या गणवेशाचा अविभाज्य अंग असलेल्या हाफ-पॅन्ट
ची जागा फुल-पॅन्टने घेतली. तरुण स्वयंसेवकांसाठी हा एक स्वागतार्य
निर्णय होता.
दहा वर्षाच्या काळात मोदी सरकारने
राबविलेल्या वेगवेगळ्या योजना व कायद्यात केलेले बदल लोकांना भावले व म्हणूनच
विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला,
फेक नरटीव्सना बळी न पडता पुन्हा एकदा २०२४ साली लागोपाठ तिसऱ्यांदा
भाजपाला विजयी केले व पुन्हा एकदा हिंदुस्तानचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदींनी
शपथ घेतली. या तीनही निवडणुकीच्या
कालखंडात कोणतीही राजकीय इच्छा-अपेक्षा
न बाळगता संघस्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन,
तळागाळात जाऊन, तन-मन-धन अर्पून प्रचार केला. याचा भाजपच्या विजयामध्ये
सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकबूल करू शकत नाही. सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या
नेतृत्वाखालील हा चौथा कालखंड म्हणजे संघाच्या गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासातील
सुवर्णकाळ आहे व जर तो टिकवायचा असेल तर भगव्या ध्वजाला शरण जाणे गरजेचे आहे. अनेक
विरोध पचवून देशातील व परदेशातील विरोधकांवर मात करून निस्वार्थ बुद्धीने व समर्पण
वृत्तीने गेली १०० वर्षे
अखंडित कार्य करणारी व उत्तरोत्तर वाढत जाणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील
एकमेव अराजकीय सामाजिक संघटना आहे व हिंदूंचे उज्वल भवितव्य हे संघाच्या हाती
सुरक्षित आहे हे यानिमित्त सांगावेसे वाटते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा