राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

 


किनारा तुला पामराला



१९२५ साली स्थापन झालेल्या संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीतील तिसरा टप्पा हा संघाला अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी लागणाऱ्या युगाच्या पायाभरणीचा होता. १९९४-२००९ हा १५ वर्षांचा तिसरा टप्पा रज्जूभैय्या व सुदर्शनजी यांच्या नेतृत्वाचा कालखंड होता. तिसऱ्या कालखंडात अस्थिर राजकीय परिस्थितीशी जुळवून घेत हिंदू समाजाला राजकीय दृष्ट्या एकत्र करून भविष्यात हिंदू विचारांचे सरकार स्थापन करणे हा उद्देश होता.

 

रज्जूभैय्यांनी संघाची सूत्रे हाती घेताच त्यांच्या सेवाभावी वृत्तीला अनुसरून सर्वप्रथम समाजाच्या विविध घटकांची सेवा करण्यासाठी . भा. सेवा विभागस्थापित केला. तसेच छोट्या उद्योगांना संघटित करण्यासाठी लघुउद्योग भारतीची स्थापना केली.

 

संघाच्या कारकिर्दीच्या या तिसऱ्या कालखंडात देशाच्या राजकीय क्षेत्रात अनेक बदल घडत होते. काँग्रेस विरुद्ध जनमत संघटित होत होते. आघाड्या युत्यांचे राजकारण जोरात होते. वेगवेगळ्या विचारसरणीचे वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन सरकारे बनवत होती व अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे ती गडगडत पण होती. अशावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला १९९६ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या सरकारचा शपथविधी झाला. परंतु हे सरकार अल्पजीवी ठरले व केवळ सोळा दिवसातच या सरकारला राजीनामा द्यावा लागला. काही का असेना, १९८४ ला ज्या पक्षाचे केवळ खासदार निवडून आले होते त्या पक्षाने त्यानंतरच्या केवळ वर्षात सत्ता स्थापनेपर्यंत मजल मारली हे एकाअर्थी हिंदूंच्या एकत्र येण्यामुळेच शक्य झाले. या कालखंडाच्या सुरुवातीलाच भाजपचे सरकार स्थापन होणे या आनंदाच्या गोष्टीबरोबरच सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे निधन होणे ही त्याहून दुःखाची गोष्ट होती.

 

या कालखंडातही आंध्रप्रदेश मधील गोदावरी खोऱ्यात चक्रीवादळांनी थैमान घातले. त्यात ९०० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला व अकल्पातील वित्तहानी झाली. अशा कठीण प्रसंगी तेथील नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्यासाठी अनेक रिलीफ कॅम्प बनवून त्यांची सेवा करण्याचे काम संघाने केले. याच वर्षे हरियाणा मधील चरखी दादरी येथे एक मोठा दुर्दैवी विमान अपघात घडला ज्यात ३५ प्रवासी मृत्युमुखी पडले. याप्रसंगी संघाने केलेल्या बचाव कार्याची जगभरात स्तुती झाली. विशेष करून आखाती देशात संघाच्या या बचाव कार्याला विशेष प्रसिद्धी देण्यात आली. १९९७ च्या अखेरीस संघाने पंजाब मधील लुधियाना येथे हजाराहून अधिक संघस्वयंसेवकांचे संमेलन भरविले होते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कालखंडात सरसंघचालक रज्जूभैयांनी केनिया व जपानचा दौरा केला व त्या देशात प्राचीन हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला.

 

सहा ऑगस्ट १९९९ रोजी संघाच्या इतिहासात एक भयंकर घटना घडली. पूर्वोत्तर भागामध्ये संघ विस्तार करणाऱ्या दीनेंद्रनाथ डे, शामलकांती सेन, शुभंकर चक्रवर्ती आणि शुद्धमय दत्त या प्रचारकांचे त्रिपुरा मधील अतिरेक्यांनी अपहरण केले. त्याच्या बदल्यात कोटी (म्हणजे आज मितीला सुमारे ४० कोटी) रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यांच्याबरोबर वाटाघाटी चालू असतानाच अतिरेक्यांनी या चारही जणांना ठार मारले व पूर्वोत्तर भारतात संघ विस्ताराच्या प्रयत्नांना गतीरोध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पूर्वोत्तर भारतात चाललेल्या बॅप्टिस्ट चर्चने प्रचंड मोठ्या धर्मांतराला संघकार्यामुळे काही प्रमाणात आळा बसत असताना व त्याचबरोबर पूर्वोत्तर भारताचे उर्वरित भारताच्या संस्कृतीशी मिलन होत असताना ज्यांना पाहावत नाही अशा नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा या माओवादी विचारसरणीच्या  देशद्रोही शक्तींनी संगनमताने संघावर केलेला हा हल्ला संघाने त्या भागात आपले कार्य अधिक वाढवून परतवून लावला. त्यामुळेच की काय कट्टर साम्यवादी विचारांचे अनेक वर्षे राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये सतत २ वर्षाहून अधिक काळ सत्तेत राहिलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवत २०१८ साली भाजपचे बहुमताचे सरकार स्थापन झाले ते आजपर्यंत. संघाला विरोध करणाऱ्यांना संघ उत्तर देतो ते असे.

 

दुर्दैवाने १९९९ साली ओरिसाच्या किनारपट्टीवर अतिशय भयंकर चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या ओरिसा प्रांताला हा प्रचंड मोठा धक्का होता. यात दहा हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. वित्तहानीची तर गणना करणे अशक्य होते. या अतिशय कठीण प्रसंगी संघाने विस्थापितांना मदत व त्यांचे पुनर्वसन करण्याचे हिमालयाएवढे मोठे काम केले.

 

शिपायांचे बंड म्हणून हे ब्रिटिश इतिहासकारांकडून हेटाळले गेलेल्या परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्राम म्हणून गौरविलेल्या ५७ च्या स्वातंत्र्यसमराला १५० वर्ष पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून २००७ साली संघाने स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास पुन्हा एकदा जगापुढे आणण्यासाठी व त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांची १५० वी वर्षपूर्ती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली. यावर्षी संघाच्या पुढाकाराने तिसरी जागतिक हिंदू परिषद देखील भरवली होती. त्यात अनेक देशातून विविध धर्माच्या प्रमुख धर्मगुरूंनी भाग घेतला होता. वैश्विक स्तरावर सर्व धर्मांनी एकमेकांचा आदर करून वैमानस्य टाळून वसुधैव कुटुंबकम या सूत्राचा आधार घेत अध्यात्मिक मार्गाने समस्त मानव जातीची उन्नती साधावी हा या मागचा उद्देश होता. याच वर्षी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमासह देशात ठीकठिकाणी अनेक कार्यक्रम, सभा, संमेलने आयोजित केली. यात एकूण १३ हजाराहून अधिक साधू-संत, लाख ८० हजाराहून अधिक सामाजिक कार्यकर्ते व कोटी ६० लाखाहून अधिक नागरिकांनी भाग घेतला.

 

या कालखंडात एकीकडे संघाचे धर्मकार्य, मदतकार्य व संघ विस्ताराचे काम जोमाने चालू होते तर दुसरीकडे भारताच्या राजकीय पटलावर अनेक चढ-उतार होत होते. याच कालखंडात आधी सांगितल्याप्रमाणे अटलजींचे १६ दिवसाचे सरकार गडगडले व त्यानंतर देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांची अल्पजीवी सरकारे अस्तित्वात आली. अस्थिर सरकारचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था अस्थिर झाली व देशाच्या विकासाचा दर देखील खालावला. महागाई वाढली. बेरोजगारी वाढली. लोक त्रस्त झाले. ही दोन्ही सरकारे केवळ चालवण्यासाठी चालवली गेली होती व यातील एकाही सरकारला ठोस असे कोणतेच पाऊल किंवा निर्णय घेता आला नव्हता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या परंतु स्पष्ट बहुमत नव्हते तेव्हा देखील अटल बिहारी बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार अठरा पगड पक्षांना एकत्रित करून अस्तित्वात आले. पण हे सरकार देखील केवळ १३ महिनेच चालले व देशाला मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे लागले. यावेळी मात्र भाजपला स्पष्ट बहुमत जरी मिळाले नसले तरी त्यामानाने चांगले यश मिळाले. मुख्य म्हणजे भाजपचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असलेला काँग्रेस पक्ष पूर्णपणे ढेपाळला होता.

 

संघ आणि भारतीय जनता पक्षाबद्दल असलेले अनेक गैरसमजांमुळे याआधी दोन वेळा स्थापन झालेल्या अल्पमतातील अटल बिहारी वाजपेयी सरकारला इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे दोन्ही वेळा ही सरकारे अल्पजीवी ठरली. परंतु १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले. भारतीय जनता पक्षाशिवाय इतर कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.  त्यावेळी कुंपणावर बसलेल्या अनेक छोट्या पक्षांना तसेच याआधी भारतीय जनता पक्षाला विरोध करणाऱ्या द्रमुक सारख्या पक्षाला देखील वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्यापासून गत्यंतर नव्हते. त्यामुळे दोन अयशस्वी प्रयत्नानंतर का होईना, यावेळी मात्र भाजपचे वाजपेयी सरकार यशस्वी ठरले व त्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला.

 

संघाच्या या तिसऱ्या कालखंडातील अस्थिर राजकीय परिस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या सुदर्शनजींनी व रज्जूभैय्यांनी राजकीय परिपक्वता दाखवत अतिशय मुत्सद्येगिरीने संघाची भूमिका पार पाडली. जणू खवळलेल्या राजकीय समुद्रात न डगमगता आपली नौका सुखरूप रीतीने किनाऱ्याला आणण्याचे कौशल्य या दोन्ही सरसंघचालकांनी दाखविले. त्यामुळे संघ विचारांच्या जवळचा असलेला भाजप,  भूतकाळाशी तुलना केली असता भारतातील सर्वात मोठा पक्ष बनला तो याच कालखं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा