राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५
गांधी हत्या आणि संघ –
पार्श्वभूमी
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश
स्वतंत्र होत असताना अखंड हिंदुस्तानचे अनेक भागात तुकडे झाले. ब्रिटिशांनी तोडा-फोडा-झोडा ही नीती वापरत संपूर्ण सिंध प्रांत व अर्ध्याहून अधिक पंजाब भारतातून
अलग केला व पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण केले.
त्याच्या जोडीला बंगालचा अर्ध्याहून अधिक भाग पाकिस्तानला दिला. फाळणीच्या दिवसात
हिंदुस्थानात प्रचंड मोठे जातीय दंगे झाले. ज्यात हिंदूंची
अपरिमित प्राण व वित्तहानी झाली. पाकिस्तानातील बहुसंख्यांक
मुस्लिमांनी तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांचे मुडदे पाडले. त्यांची संपत्ती लुटली. महिलांवर बलात्कार केला. त्यामुळे तेथील हिंदूंना आपले घरदार सोडून भारतामध्ये आश्रय घेण्याशिवाय
कुठलाही पर्याय राहिला नव्हता.
जगाच्या इतिहासातील
सर्वात मोठे मानवी स्थलांतर या काळाने पाहिले. ज्याची सल प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. त्याचवेळी गांधीजींनी पाकिस्तानला नुकसान भरपाई म्हणून ५५ कोटी रुपये द्यावेत असा आग्रह धरला. या रकमेची सोन्याच्या भावाने तुलना केली
असता आजची रक्कम ४५,००० कोटी एवढी प्रचंड होते. गरीब हिंदुस्थानाला ही रक्कम परवडणारी
नव्हती. एवढेच नव्हे तर शत्रुराष्ट्र पाकिस्तानला एवढी रक्कम
देऊन त्याला बलशाली बनवणे हे आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारण्याजोगे होते. अंध गांधीभक्तांखेरीज हे कोणालाही पटणारे नव्हते.
फाळणी संदर्भात देशात दोन टोकाचे मतप्रवाह होते. त्यावेळी
काँग्रेसचे नेतृत्व गांधीजींकडे होते. सुरुवातीला गांधीजी जरी फाळणीच्या विरोधात होते तरी शेवटी त्यांनी फाळणी मान्य केली. त्यामुळे देशाच्या फाळणीला गांधीजीच जबाबदार आहेत असा बहुतेकांचा समज
होता. यामुळे गांधीजींना ‘महात्मा’ म्हणणारे लोक देखील गांधीजींचा विरोध करू लागले होते. या विरोधातूनच ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या पत्रकार, संपादक तरुणाने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली. गांधीहत्येची बातमी जेव्हा गुरुजींना कळली
त्यावेळी त्यांच्या मुखातून ‘ही केवळ अमानुष कृती आहे’
अशी पहिली प्रतिक्रिया निघाली. ज्यावेळी त्यांना गांधीजींवर
गोळ्या चालविणाऱ्याचे नाव कळले त्यावेळी या दूरदृष्टी असलेल्या ऋषितुल्य
सरसंघचालकांनी ‘संघकार्य वीस वर्षांनी मागे गेले’ असे उद्गार काढले.
संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला हादरविणारी ही घटना होती. तिचे पडसाद अगदी आजही उमटत आहेत. एक गोष्ट
सत्य की देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती. कट्टर
इस्लाम पंथीयांनी देश स्वतंत्र होण्याआधीच ही मागणी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी सशस्त्र उठाव करून, जमल्यास, हिंदूंची संपूर्ण कत्तल करण्याची तयारी देखील करून ठेवली होती. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक भागात तसे प्रयत्न देखील करण्यात आले होते.
त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू सुद्धा त्याला विरोध करण्यासाठी व
आपला जीव वाचावा या उद्देशाने आपल्या परीने प्रतिक्रिया देत होते. नथुराम गोडसे हे त्यापैकीच एक होते.
३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची
हत्या झाली. नेहरूजींच्या
इको सिस्टीमने ‘गांधीहत्तेला संघ जबाबदार आहे’ अशी आवई उठवली. काँग्रेसवाल्यांना एकत्र येवून
संघावर हल्ला करण्यास एक दिवस लागला. १ फेब्रुवारी १९४८ रोजी
गुरुजींच्या घरासमोर हल्ला करण्यासाठी हजारो काँग्रेसवाले
जमा झाले. अहिंसेचे पुजारी म्हणविणाऱ्या गांधीजींचे
सशस्त्र व हिंसक भक्त गुरुजींना ठार
मारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले. त्यावेळी पोलिसांनी गुरुजींना तेथून दूर जाण्याचा सल्ला दिला. गुरुजींनी हा सल्ला नम्रपणे नाकारून ‘आहे त्याच घरात राहण्याचा’ धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी ते म्हणाले की ‘ज्या समाजासाठी मी कार्य करीत आहे त्या समाजालाच जर मी नको असेन तर मी
कुठे जाऊ? जे व्हायचं ते होऊ दे’.
सुदैवाने पोलिसांनी बळाचा वापर करून हल्लेखोरांना दूर केले
व गुरुजींचा जीव वाचला. पण त्याच रात्री गांधीहत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर लागलेले आरोप वाचून गुरुजी म्हणाले ‘संशयाचं
हे धुकं दूर होईल आणि या अग्निपर्वातुन
निष्कलंक होऊन आपण सारे जण बाहेर येऊ’. एवढा दुर्दम्य
आत्मविश्वास व आपण न केलेल्या कृत्याबद्दल अविचलित राहून शांतपणे पोलीस कारवाईला सामोरे
जाण्याचं धैर्य गुरुजींनी दाखवलं.
वास्तविक पाहता संघाला त्यावेळी कोणतीही लिखित घटना नव्हती. संघ स्वयंसेवक बनण्यासाठी कोणतीही नोंदणीची
पद्धत नव्हती. संघ स्वयंसेवकांचा रेकॉर्ड नव्हता. संघात प्रवेश करताना कोणतीही फी घेतली जात नव्हती.
संघात प्रवेश करायचा म्हणजे ‘खुल्या मैदानात, दरवाजा-खिडकी नसलेल्या शाखेमध्ये दाखल व्हायचे व जेव्हा
जावे वाटेल त्या दिवशी जायचे’ अशी पद्धत होती. त्यामुळे
नथुराम गोडसे हे संघाचे स्वयंसेवक होते या विरोधकांच्या मूळ आरोपात काहीही तथ्य
नसल्यामुळे ते सिद्धच होऊ शकत नव्हते. तरीही स्वतः बद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना बाळगणारे, एक अतार्किक, अव्यवहार्य व वस्तुस्थितीपासून कोसो दूर असलेली विचारधारा असलेले, पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे हेकेखोर, हट्टी नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांचा, सर्वांनाच माहीत असलेल्या कारणामुळे, संघावर राग
होता. एवढेच नव्हे तर ते संघाचा द्वेष करत. मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही हट्टापायी, संघावरील वैयक्तिक रागापायी, त्यांनी गांधीहत्येची संधी साधत २ फेब्रुवारी १९४८ रोजी केंद्रशासित प्रदेशात व ४ फेब्रुवारी १९४८ रोजी देशभर
संघावर बंदी घातली. १७ हजाराहून अधिक संघ
स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. ‘दंगे करणे व लुटमार करणे’
यासारखे तद्दन खोटे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. परंतु या
निराधार आरोपांविरुद्ध संघ स्वयंसेवकांनी न्यायालयाचे
दरवाजे ठोठावले व केवळ ४५ दिवसातच सरकारने केलेली अटक न्यायालयाने
घटनाबाह्य व अतार्कीक ठरवत त्या सर्वांना निर्दोष मुक्त केले. नेहरु व त्यांचे चेले-चपाटे तोंडावर आपटले.
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५
मोगरा फुलला
१९२५ साली स्थापन झालेल्या
संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीतील चौथा टप्पा व सद्य कालखंड हा
हिंदुराष्ट्र बनविण्याच्या संघाच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचताना वाढलेल्या
जबाबदारीच्या जाणिवेचा
आहे. २००९ पासूनचा आजतागायत १५
वर्षांचा हा चौथा टप्पा डॉ. मोहनराव
भागवतांच्या नेतृत्वाचा वर्तमान कालखंड आहे. या चौथ्या टप्प्यातच भारताला
विश्वगुरू बनविण्यासाठी विकासाच्या माध्यमातून जनमत संघटीत करणे व संघाला त्याच्या अंतिम
ध्येयाकडे नेणे हे शक्य आहे.
डॉ. मोहनराव भागवत यांनी सरसंघचालक
पदाची सूत्रे २००९ साली
हाती घेतली व त्यांच्या जोडीला सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांची सरकार्यवाह
म्हणून निवड करण्यात आली.
यावर्षी संघाच्या पुढाकाराने व सक्रिय सहभागाने ‘गो-संवर्धन व ग्राम केंद्रित शेती’ याचे महत्त्व लोकांना कळावे
म्हणून महत्त्वाच्या साधू-संतांचा सहभाग असलेली ‘विश्वमंगल
गौ-ग्राम यात्रा’ काढण्यात आली.
२३ हजार
३००
गावांमध्ये संपर्क अभियान
राबविण्यात आले.
यात ११ लाखाहूनही अधिक लोकांनी सहभाग घेतला.
२०१ खासदारांनी व ८६७ आमदारांनी आमदारांनी या महत्त्वपूर्ण
अभियानाला आपला लिखित पाठिंबा दिला.
या यात्रेच्या व उद्दिष्टांच्या समर्थनार्थ आठ कोटी ३४ लाख नागरिकांच्या सह्या गोळा
करण्यात आल्या.
यात ७५ हजाराहून अधिक ख्रिश्चन व
सुमारे अकरा लाख मुस्लिम बांधवांच्या पाठिंब्याचा वाटा आहे. या यात्रेच्या समर्थनार्थ
विविध ठिकाणी स्थानिक स्वरूपात,
सुमारे सव्वा लाख केंद्रात,
अशाच प्रकारच्या यात्रा काढण्यात आल्या ज्यात
सुमारे दीड कोटी नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला.
९२७१ पूर्णवेळ
स्वयंसेवकांनी व त्यांच्या जोडीला एक लाख ४१ हजार ३५ संघ स्वयंसेवकांनी एकत्रित असे सुमारे २६००० किलोमीटरचे अंतर कापले. २८ सप्टेंबर २००९ रोजी हरियाणा मधील कुरुक्षेत्र येथून
सुरू झालेली विश्वमंगल गौ-ग्रामयात्रा
यात्रेची सांगता १७ जानेवारी
२०१० रोजी
महाराष्ट्रातील नागपूर येथे म्हणजेच संघाच्या मुख्यालयाच्या शहरात झाली.
२०१० साली उत्तर कर्नाटकात आलेल्या
पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते.
अशावेळी सुमारे २४०० संघ
स्वयंसेवकांनी १८० गावात
मदत साहित्याचे वाटप केले.
संघाचीच एक संस्था असलेल्या ‘सेवा
भारती’ ने ९ गावात १६८० घरे बांधून पुरामध्ये विस्थापित
झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन केले.
याच वर्षी सरसंघचालक डॉ.
मोहनराव भागवत यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ठिकठिकाणी मोहनरावांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याला
संपूर्ण गणवेशात संघस्वयंसेवक उपस्थित राहत.
केरळ, मंगलोर आधी भारताच्या दक्षिण
भागात तर पूर्ण गणवेशातील संघ स्वयंसेवकांची उपस्थिती ९० हजारापर्यंत पोहोचली होती
याला उत्तरेकडील महाकौशल
सारखा विभागही अपवाद नव्हता. २०११ साली
हिंदू समाजाला भेडसावणारे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी व हिंदू
समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मा
नर्मदा सामाजिक कुंभ’
या उत्सवाचे मंदाला येथे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवात ३३६ जिल्ह्यातील ११७९ तालुक्यातील ४००० हून अधिक गावातील विविध जाती-जमातीतील नागरिक उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे यात ४१५ वेगवेगळ्या अनुसूचित जाती-जमातींनी
आपला सहभाग नोंदवला होता.
तीन दिवस चाललेल्या या उत्सवात तीस लाखाहून अधिक भाविकांनी श्रद्धापूर्वक भाग घेतला होता.
२०१३ साली
‘हिंदू योद्धा’ असे ज्यांचे वर्णन करतात व
ज्यांनी हिंदू धर्माची महती साऱ्या विश्वापुढे मांडली असे महान तत्त्वचिंतक व
विचारवंत स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या
जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या बॅनर खाली व संघाच्या सहभागाने देशभरात अनेक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वामी विवेकानंदांचे विचार पोहोचविण्यासाठी
विवेकानंद केंद्राने या कार्यक्रमात गायत्री परिवार,
रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, स्वामी नारायण सांप्रदाय, विविध जैन संघटना यांना सहभागी
करून घेतले. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात
समाजाच्या सर्व क्षेत्रातील विचारवंत,
बुद्धिजीवी, पत्रकार, वैज्ञानिक, संरक्षण दलातील अधिकारी, सेवानिवृत्त न्यायमूर्ती व
शिक्षणतज्ञ यांनी उत्साहाने भाग घेऊन आपापले विचार व्यक्त केले व संघकार्याची
प्रशंसा केली.
दुर्दैवाने याच वर्षी उत्तराखंडमध्ये
चार धाम यात्रेदरम्यान अतिशय भयंकर अशी नैसर्गिक आपत्ती ओढवली. नेहमीप्रमाणेच संघाने त्वरितच
आपले बचाव कार्य सुरू केले आपले कर्तव्य चोखपणे बजावले. २०१६ साली आधुनिक समाजाला योग्य
असा गणवेशात बदल करण्याचा निर्णय संघाने घेतला.
९० वर्षापासून
संघाच्या गणवेशाचा अविभाज्य अंग असलेल्या हाफ-पॅन्ट
ची जागा फुल-पॅन्टने घेतली. तरुण स्वयंसेवकांसाठी हा एक स्वागतार्य
निर्णय होता.
संघाचा हा चौथा कालखंड राजकीय दृष्ट्या अतिशय भरभराटीचा आहे. संघाची विचारधारा मान्य करणारा भाजपा हा राजकीय पक्ष २००४ ते २०१४ या काळात काहीसा मागे पडला होता. भाजपाचे अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासारखे दिग्गज नेते वयोमानानुसार निवृत्तीकडे झुकत चालले होते. अशा वेळी भाजपाला नव्या नेतृत्वाचा शोध घेण्याची गरज होती. २००१ पासून २०१४ पर्यंत गुजरात या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करणारे संघाचे माजी प्रचारक, संघ स्वयंसेवक व भाजपाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस नरेंद्र मोदी यांची २०१३ ला गोवा येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपाचे प्रचारप्रमुख म्हणून निवड झाली आणि त्याचबरोबर भाजपाच्या नवनेतृत्वाचा शोध थांबला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला २८३ जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळाले. याचीच पुनरावृत्ती २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत झाली जेव्हा भाजपाला २०१४ हूनही अधिक म्हणजे ३०३ जागा मिळाल्या.
दहा वर्षाच्या काळात मोदी सरकारने
राबविलेल्या वेगवेगळ्या योजना व कायद्यात केलेले बदल लोकांना भावले व म्हणूनच
विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला,
फेक नरटीव्सना बळी न पडता पुन्हा एकदा २०२४ साली लागोपाठ तिसऱ्यांदा
भाजपाला विजयी केले व पुन्हा एकदा हिंदुस्तानचे प्रधानसेवक म्हणून नरेंद्र मोदींनी
शपथ घेतली. या तीनही निवडणुकीच्या
कालखंडात कोणतीही राजकीय इच्छा-अपेक्षा
न बाळगता संघस्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन,
तळागाळात जाऊन, तन-मन-धन अर्पून प्रचार केला. याचा भाजपच्या विजयामध्ये
सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकबूल करू शकत नाही. सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या
नेतृत्वाखालील हा चौथा कालखंड म्हणजे संघाच्या गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासातील
सुवर्णकाळ आहे व जर तो टिकवायचा असेल तर भगव्या ध्वजाला शरण जाणे गरजेचे आहे. अनेक
विरोध पचवून देशातील व परदेशातील विरोधकांवर मात करून निस्वार्थ बुद्धीने व समर्पण
वृत्तीने गेली १०० वर्षे
अखंडित कार्य करणारी व उत्तरोत्तर वाढत जाणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील
एकमेव अराजकीय सामाजिक संघटना आहे व हिंदूंचे उज्वल भवितव्य हे संघाच्या हाती
सुरक्षित आहे हे यानिमित्त सांगावेसे वाटते.
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५
१९२५ साली स्थापन
झालेल्या संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीतील तिसरा टप्पा हा संघाला अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी
लागणाऱ्या युगाच्या पायाभरणीचा होता. १९९४-२००९ हा १५ वर्षांचा तिसरा टप्पा रज्जूभैय्या व सुदर्शनजी यांच्या नेतृत्वाचा कालखंड होता. तिसऱ्या कालखंडात अस्थिर राजकीय
परिस्थितीशी जुळवून घेत हिंदू समाजाला राजकीय दृष्ट्या एकत्र करून भविष्यात हिंदू
विचारांचे सरकार स्थापन करणे हा उद्देश होता.
रज्जूभैय्यांनी संघाची
सूत्रे हाती घेताच त्यांच्या सेवाभावी वृत्तीला अनुसरून सर्वप्रथम समाजाच्या विविध घटकांची सेवा करण्यासाठी ‘अ. भा. सेवा विभाग’ स्थापित केला. तसेच छोट्या उद्योगांना संघटित करण्यासाठी
‘लघुउद्योग
भारती’ ची स्थापना केली.
संघाच्या कारकिर्दीच्या या तिसऱ्या कालखंडात
देशाच्या राजकीय क्षेत्रात अनेक बदल घडत होते. काँग्रेस विरुद्ध जनमत संघटित होत होते. आघाड्या युत्यांचे राजकारण जोरात होते. वेगवेगळ्या
विचारसरणीचे वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन सरकारे बनवत होती व अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे
ती गडगडत पण होती. अशावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘भाजप’ हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला व १९९६ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या सरकारचा शपथविधी झाला. परंतु हे सरकार अल्पजीवी ठरले व केवळ सोळा
दिवसातच या सरकारला राजीनामा द्यावा लागला. काही का असेना, १९८४ ला ज्या पक्षाचे केवळ २ खासदार निवडून आले होते त्या पक्षाने त्यानंतरच्या केवळ १२ वर्षात सत्ता स्थापनेपर्यंत मजल मारली हे एकाअर्थी
हिंदूंच्या एकत्र येण्यामुळेच शक्य झाले. या कालखंडाच्या सुरुवातीलाच भाजपचे सरकार
स्थापन होणे या आनंदाच्या गोष्टीबरोबरच सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे निधन होणे
ही त्याहून दुःखाची गोष्ट होती.
या कालखंडातही आंध्रप्रदेश मधील गोदावरी खोऱ्यात
चक्रीवादळांनी थैमान घातले. त्यात ९०० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला व अकल्पातील
वित्तहानी झाली. अशा कठीण
प्रसंगी तेथील नागरिकांना मदत करण्याचे व त्यांच्यासाठी अनेक रिलीफ कॅम्प बनवून
त्यांची सेवा करण्याचे काम संघाने केले. याच वर्षे हरियाणा
मधील चरखी दादरी येथे एक मोठा दुर्दैवी विमान अपघात घडला ज्यात ३५० प्रवासी
मृत्युमुखी पडले. याप्रसंगी संघाने केलेल्या बचाव कार्याची जगभरात स्तुती झाली. विशेष करून आखाती देशात संघाच्या या बचाव कार्याला
विशेष प्रसिद्धी देण्यात आली. १९९७ च्या अखेरीस संघाने पंजाब मधील
लुधियाना येथे २१ हजाराहून अधिक संघस्वयंसेवकांचे संमेलन भरविले होते त्याला
प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कालखंडात सरसंघचालक रज्जूभैयांनी केनिया व जपानचा दौरा केला व त्या देशात प्राचीन
हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला.
सहा ऑगस्ट १९९९ रोजी संघाच्या इतिहासात एक भयंकर घटना घडली. पूर्वोत्तर भागामध्ये संघ विस्तार करणाऱ्या
दीनेंद्रनाथ डे, शामलकांती सेन, शुभंकर चक्रवर्ती आणि शुद्धमय दत्त या ४ प्रचारकांचे त्रिपुरा मधील अतिरेक्यांनी अपहरण केले. त्याच्या बदल्यात २ कोटी (म्हणजे आज मितीला सुमारे ४० कोटी) रुपयांची खंडणी
मागण्यात आली. त्यांच्याबरोबर वाटाघाटी चालू असतानाच अतिरेक्यांनी या चारही जणांना
ठार मारले व पूर्वोत्तर भारतात संघ विस्ताराच्या प्रयत्नांना गतीरोध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पूर्वोत्तर भारतात चाललेल्या बॅप्टिस्ट चर्चने प्रचंड मोठ्या
धर्मांतराला संघकार्यामुळे काही प्रमाणात आळा बसत असताना व त्याचबरोबर पूर्वोत्तर भारताचे उर्वरित भारताच्या संस्कृतीशी मिलन होत असताना ज्यांना
पाहावत नाही अशा नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा या
माओवादी विचारसरणीच्या देशद्रोही शक्तींनी संगनमताने संघावर केलेला हा हल्ला संघाने
त्या भागात आपले कार्य अधिक वाढवून परतवून लावला. त्यामुळेच की काय कट्टर साम्यवादी
विचारांचे अनेक वर्षे राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये सतत
२५ वर्षाहून अधिक काळ सत्तेत राहिलेल्या मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवत २०१८ साली भाजपचे बहुमताचे सरकार स्थापन झाले ते आजपर्यंत. संघाला विरोध करणाऱ्यांना संघ उत्तर देतो
ते असे.
दुर्दैवाने १९९९ साली ओरिसाच्या किनारपट्टीवर
अतिशय भयंकर चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या ओरिसा
प्रांताला हा प्रचंड मोठा धक्का होता. यात दहा हजाराहून अधिक
नागरिकांचा मृत्यू झाला. वित्तहानीची तर गणना करणेच अशक्य होते. या अतिशय कठीण प्रसंगी संघाने
विस्थापितांना मदत व त्यांचे पुनर्वसन करण्याचे हिमालयाएवढे मोठे काम केले.
शिपायांचे बंड म्हणून हे ब्रिटिश इतिहासकारांकडून
हेटाळले गेलेल्या परंतु स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्राम म्हणून गौरविलेल्या १८५७
च्या स्वातंत्र्यसमराला १५० वर्ष पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून २००७ साली संघाने स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास पुन्हा
एकदा जगापुढे आणण्यासाठी व त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांची १५० वी वर्षपूर्ती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली. यावर्षी संघाच्या पुढाकाराने तिसरी जागतिक
हिंदू परिषद देखील भरवली होती. त्यात अनेक देशातून विविध
धर्माच्या प्रमुख धर्मगुरूंनी भाग घेतला होता. वैश्विक
स्तरावर सर्व धर्मांनी एकमेकांचा आदर करून वैमानस्य टाळून ‘वसुधैव
कुटुंबकम’ या सूत्राचा आधार घेत अध्यात्मिक मार्गाने समस्त
मानव जातीची उन्नती साधावी हा या मागचा उद्देश होता. याच वर्षी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर
गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिल्ली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमासह देशात ठीकठिकाणी अनेक कार्यक्रम,
सभा, संमेलने आयोजित केली. यात एकूण १३
हजाराहून अधिक
साधू-संत, १ लाख ८० हजाराहून अधिक सामाजिक कार्यकर्ते व १ कोटी ६० लाखाहून अधिक नागरिकांनी भाग
घेतला.
या कालखंडात एकीकडे संघाचे धर्मकार्य, मदतकार्य व संघ विस्ताराचे काम जोमाने चालू
होते तर दुसरीकडे भारताच्या राजकीय पटलावर अनेक चढ-उतार होत होते. याच कालखंडात आधी सांगितल्याप्रमाणे अटलजींचे १६ दिवसाचे सरकार गडगडले व
त्यानंतर देवेगौडा,
इंद्रकुमार गुजराल यांची अल्पजीवी सरकारे अस्तित्वात आली. अस्थिर सरकारचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था
अस्थिर झाली व देशाच्या विकासाचा दर देखील खालावला. महागाई वाढली. बेरोजगारी वाढली. लोक त्रस्त झाले. ही दोन्ही सरकारे केवळ चालवण्यासाठी चालवली गेली होती व यातील एकाही सरकारला
ठोस असे कोणतेच पाऊल किंवा निर्णय घेता आला नव्हता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला अधिक
जागा मिळाल्या परंतु स्पष्ट बहुमत नव्हते तेव्हा देखील अटल बिहारी बाजपेयी यांच्या
नेतृत्वाखाली युतीचे सरकार अठरा पगड पक्षांना एकत्रित करून
अस्तित्वात आले. पण हे सरकार
देखील केवळ १३ महिनेच चालले व देशाला मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे लागले. यावेळी मात्र भाजपला स्पष्ट बहुमत जरी मिळाले नसले तरी त्यामानाने चांगले यश मिळाले. मुख्य म्हणजे भाजपचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असलेला काँग्रेस पक्ष पूर्णपणे ढेपाळला होता.
संघ आणि भारतीय जनता पक्षाबद्दल असलेले अनेक गैरसमजांमुळे
याआधी दोन वेळा स्थापन झालेल्या अल्पमतातील अटल
बिहारी वाजपेयी सरकारला इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे दोन्ही वेळा ही सरकारे अल्पजीवी
ठरली. परंतु १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला
आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले. भारतीय जनता पक्षाशिवाय इतर कोणताही पक्ष
सरकार स्थापन करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी कुंपणावर बसलेल्या अनेक छोट्या पक्षांना तसेच याआधी भारतीय जनता
पक्षाला विरोध करणाऱ्या द्रमुक सारख्या पक्षाला देखील वाजपेयी सरकारला पाठिंबा
देण्यापासून गत्यंतर नव्हते. त्यामुळे दोन अयशस्वी
प्रयत्नानंतर का होईना, यावेळी मात्र भाजपचे वाजपेयी सरकार
यशस्वी ठरले व त्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला.
संघाच्या या तिसऱ्या कालखंडातील अस्थिर राजकीय परिस्थितीत संघाचे
नेतृत्व करणाऱ्या सुदर्शनजींनी व रज्जूभैय्यांनी राजकीय परिपक्वता दाखवत अतिशय
मुत्सद्येगिरीने संघाची भूमिका पार पाडली. जणू खवळलेल्या राजकीय समुद्रात न
डगमगता आपली नौका सुखरूप रीतीने किनाऱ्याला आणण्याचे कौशल्य या दोन्ही सरसंघचालकांनी दाखविले. त्यामुळे संघ
विचारांच्या जवळचा असलेला भाजप, भूतकाळाशी तुलना केली
असता भारतातील सर्वात मोठा पक्ष
बनला तो याच कालखंड.
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५
आधी हाताला चटके
१९२५ साली स्थापन
झालेल्या संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीतील दुसरा टप्पा हा संघाच्या विस्ताराचा होता. १९७३-१९९४ हा २१ वर्षांचा दुसरा कालखंड म्हणजे
ज्यात संघाचे नेतृत्व बाळासाहेब देवरस यांच्याकडे होते तो कालखंड. दुसऱ्या
टप्प्यात लोकशाही टिकवण्यासाठी लढा देताना संघविचारांना जवळ अश्या राजकीय पक्षाला
बळ देवून आसेतू हिमाचल पसरलेल्या खंडप्राय देशातील सर्व प्रदेशात पाय रोवणे हे ध्येय होते.
बाळासाहेबांनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माधवराव मुळे यांची सरकार्यवाह
म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९७४
साली ज्या छत्रपती
शिवाजी महाराजांना संघात अतिशय मानाचे स्थान आहे, एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी हिंदवी स्वराज्य
स्थापन केले तो दिवस संघात एक उत्सव म्हणून साजरा होतो. त्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदू साम्राज्य दिनाची’ तीनशेवी वर्षपूर्ती संघाने संपूर्ण देशभर साजरी
केली. यानिमित्ताने
छत्रपती शिवाजी महाराजांना संघातर्फे मानवंदना
तर देण्यात आलीच
पण त्याचबरोबर हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशीच
हिंदूराष्ट्राची स्थापना या देशात व्हावी अशी प्रतिज्ञा ही करण्यात आली.
दुर्दैवाने
त्याच्या पुढील वर्षीच म्हणजे १९७५ साली
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभर आणीबाणी घोषित केली व संघावर बंदी आणली.
सरसंघचालकांसहित लाखो संघस्वयंसेवकांना
तुरुंगात डांबण्यात आले. अशा वेळी आणीबाणीला सक्रीय विरोध
करण्याचा निर्णय संघाने घेतला व त्यासाठी ‘अखिल भारतीय लोकसंघर्ष समितीची’ स्थापना
करण्यात आली. आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या हातातील
बाहुले बनलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी
संघस्वयंसेवकांचे अनन्वित हाल केले पण त्याला न डगमगता संघाने आणीबाणी विरुद्ध
जोरदार लढा दिला.
आणीबाणीची १९
महिन्यांची काळीकुट्ट रात्र
संपल्यावर १९७७ साली सरकारने तुरुंगातून संघासहित सर्व पक्षांच्या नेत्यांची सुटका केली. व त्यानंतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन
काँग्रेस विरुद्ध एकत्रित निवडणूक लढविण्याचा निश्चय
केला. त्यावेळी स्थापन झालेल्या सर्व पक्षांच्या एकत्र
अशा जनता पार्टी मध्ये संघाला
मानणाऱ्या भारतीय जनसंघाचे विलीनीकरण करण्यात आले. १९७७ च्या लोकसभा
निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला व जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर २१ महिन्यांची संघावरील बंदी उठवली गेली.
त्याच
वर्षीच्या अखेरीस आंध्रप्रदेशमधील सागरी किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड मोठ्या
प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी झाली. संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र खपून
नागरिकांना मदत केली. १९७८ साली ज्येष्ठ संघ प्रचारक व भारतीय
जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष,
थोर विचारवंत व एकात्म मानवतावादाचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर
आधारित संशोधन करण्यासाठी ‘दीनदयाळ
शोध संस्थान’ ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर १९७९ साली संघाच्या
पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेचे दुसरे जागतिक धर्म संमेलन
आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनास दलाई लामांसहित जगभरातील जवळजवळ सर्व धर्माचे प्रमुख जातीने उपस्थित होते.
संघ
विस्तार करण्यासाठी १९८० साली संघाने महाजनसंपर्क अभियान राबविले. ९५
हजार गावातील १ कोटीहून अधिक
कुटुंबांना संघ स्वयंसेवकांनी
प्रत्यक्ष भेटून संपर्क केला.
संघ वाढतो आहे या कल्पनेनेच घामाघूम झालेल्या समाजवादी मंडळींनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे जनता पार्टीतील पूर्वीच्या जनसंघामध्ये असलेल्या नेत्यांनी नाईलाजाने बाहेर
पडत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय
जनता पक्षाची स्थापना केली.
१९८१ साली मीनाक्षीपुरम येथे झालेल्या सामूहिक धर्मांतराने
देशभरात संतापाची प्रचंड लाट उसळली. तामिळनाडूमधील ८०० हिंदू
कुटुंबीयांचे इस्लामी कट्टरपंथीयांनी जबरदस्तीने धर्मांतरण केले. संघाने हा मुद्दा देशभर उचलून जनजागृतीचे
काम केले व हिंदू कुटुंबीयांवर धर्माचे संस्कार व्हावेत म्हणून संस्कार भारतीची
स्थापना करण्यात आली. १९८३ साली
संघाच्या संपूर्ण सहकार्याने/
सहभागाने विश्व हिंदू परिषदेने एकात्मता यज्ञाचे आयोजन केले होते. भारतमाता व गंगामाता यांच्यावरील श्रद्धाभाव वाढवा हा यामागील मुख्य
उद्देश होता.
१९८४ साली इंदिरा
गांधींची दुर्दैवी हत्या झाली त्यावेळी हजारो शिख बांधवांना दिल्ली वा आसपासच्या प्रदेशात ठार मारण्यात आले. त्यावेळी शेकडो शिख परिवारांना सुरक्षा
देण्याचे काम स्वयंसेवकांनी केले. त्याचप्रमाणे दिल्ली व
आसपासच्या प्रदेशात शिख दंगल पीडितांना आसरा व जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी
रिलीफ कॅम्प उभारण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टार मुळे काही
प्रमाणात मोडतोड झालेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या उभारणीसाठी झालेल्या कारसेवेत संघ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
१९८८ साली
आद्य सरसंघचालक डॉ.
हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघाने पुन्हा एकदा महाजनसंपर्क अभियान
राबविले. त्या वर्षी
दीड लाख कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन ११ कोटी
रुपयांचा सेवा कार्यासाठी लागणारा निधी जमविण्यात आला. व्यापक संपर्कासाठी व
संघविचारांच्या प्रचारासाठी,
प्रसारासाठी वर्षभरात ठिकठिकाणी ७६ हजारहून
अधिक सभा-संमेलने घेण्यात आली. संघाचे हिंदू समाजाला संघटित करण्याचे
प्रयत्न यशस्वी होतात हे लक्षात आल्यामुळे हिंदूधर्माविरोधी अतिरेक्यांनी २५ जून १९८९ रोजी पंजाब मधील
मोगा शहरात संघशाखेवर हल्ला केला.
दुर्दैवाने यात १८
स्वयंसेवक व सहा सामान्य नागरिक
हुतात्मा झाले व
२८ नागरिक गंभीररित्या जखमी झाले. या हल्ल्यामुळे संघ राष्ट्रद्रोही शक्तींच्या निशाण्यावर आहे व संघाचे
देशाला बलशाली करण्यासाठी चाललेले काम भारत विरोधी कारवाया करणाऱ्या देशद्रोही
अतिरेक्यांना मुळीच खपत नाही यावर शिक्कामोर्तब झाले.
याच कालखंडात
श्रीराम जन्मभूमी आंदोलन
पेटले होते. विश्व हिंदू
परिषदेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनात संघ व संघ परिवार सक्रियपणे उतरला
होता. संपूर्ण देशभर रामशिलांचे पूजन होत होते व रामशिला वाजत गाजत अयोध्येला नेल्या जात होत्या. भविष्यात होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या
उभारणीसाठी लागणाऱ्या या शिला भारतीयांच्या श्रद्धेचे व आस्थेचे
प्रतीक होत्या. सहा डिसेंबर
१९९२ रोजी लाखो कारसेवकांनी
साडेचारशे वर्ष चाललेला हा लढा संपवला व मुघल आक्रमक बाबराने श्रीराम जन्मभूमी
मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेली अनधिकृत बाबरी मशिदच उध्वस्त केली. सहिष्णू असलेला हिंदू समाज जेव्हा जागा होतो, एक होतो तेव्हा इतिहास घडतो हे या घटनेवरून सिद्ध झाले.
परंतु
बाबरी मशिदीचा पाडाव झाल्यानंतर १० डिसेंबर १९९२ रोजी सरकारने संघावर तिसऱ्या बंदीची घोषणा केली. परंतु यानिमित्त नेमलेल्या आयोगाने संघावरील
बंदी असमर्थनीय व अन्यायकारक असल्याचा निष्कर्ष काढला व ४ जून १९९३ रोजी
संघावरील बंदी उठवण्यात आली. दुसऱ्या तसेच तिसऱ्या संघबंदीच्या
या कालखंडात
तृतीय सरसंघचालक बाळासाहेब
देवरसांनी अतुलनीय धारिष्ट्य,
संयम, मुत्सद्दीपणा व नेतृत्वगुणांचा परिचय दिला व संघाला या
संकटकाळातून सहीसलामत बाहेर काढले.
या
आणि पुढील वर्षी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ‘अ.भा. पूर्व
सैनिक सेवा परिषदची’
स्थापना करण्यात आली. १९९४ साली संघाच्या १०० वर्षाच्या वाटचालीतील
दुसऱ्या कालखंडाचे महानायक सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी प्रकृतीच्या कारणावरून सरसंघचालकपदाची
सूत्रे खाली ठेवली व प्रो.
राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैया यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच संघाच्या या शानदार शतकी वाटचालीतील
दुसरा टप्पा संपला व तिसरा टप्पा प्रारंभ झाला. त्याचा आढावा आपण पुढील लेखात घेणार आहोत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)