राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, २४ मार्च, २०२५

 

रामजन्मभूमी - दार उघड बये दार


रामजन्मभूमी मुक्ती लढ्याचा इतिहास जरी एकूण ४७५ वर्षाचा असला व त्यासाठी हिंदूंनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन लढा दिला असला तरीही संघ आणि संघ परिवाराच्या राम जन्मभूमी मुक्ती लढ्यातील सहभागाविषयी बोलताना आपल्याला साधारणपणे १९८४ पासून सुरुवात करावी लागेल.

 

विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने पहिली धर्मसंसद एप्रिल १९८४ ला दिल्ली येथे भरली व त्या धर्मसंसदेच्या अधिवेशनात ८ धर्माचार्यांनी एकत्र येत श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे कार्य करण्याचा ठराव मंजूर केला. ७ ऑक्टोबरला हिंदू बाहू शक्ती को तोलो, रामजन्मभूमी का ताला खोलो अशी गर्जना देत २ लाखाहून अधिक रामभक्त शरयूतीरी जमा झाले. १४ ऑक्टोबरला रामभक्तांनी लखनऊ शहरात अभूतपूर्व अशी शोभायात्रा काढली ज्यात ५ लाखाहून अधिक श्रद्धाळूंनी भाग घेतला होता. त्यावेळी माजी पोलीस महानिर्देशक सतीशचंद्र दिक्षित यांनी लखनऊचे राष्ट्रभक्त नागरिक श्रीरामाला कारागृहातून मुक्त करण्यासाठी आपला सक्रिय सहयोग देतील असे उद्गार काढून आपले समर्थन जाहीर केले. २१ जानेवारी १९८६ ला उमेशचंद्र पांडे या वकिलाने फैजाबादच्या न्यायालयात एक दावा दाखल केला. या दाव्यात रामलल्लाच्या मंदिराला लावण्यात आलेले कुलूप हे बेकायदेशीर आहे व या कुलपामुळे श्रीरामाची पूजा करण्याच्या हिंदूंच्या धार्मिक अधिकारात व्यत्यय येत असल्याने हे घटनादत्त धार्मिक स्वातंत्र्याचे हनन आहे असे सरकारवर आरोप करण्यात आले होते.

 

याच सुमारास सुप्रसिद्ध शहाबानू खटल्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारने मुस्लिम धर्मातील जहाल मतवाद्यांच्या रेट्याला बळी पडून सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय घटनादुरुस्ती करून बदलला व त्यामुळे संपूर्ण भारतात संविधानाला मानणाऱ्या सर्वसामान्य माणसांसहित हिंदूंच्या रोषालाही त्यांना बळी पडावे लागले. राजीव गांधींचा हा निर्णय त्यांच्या पक्षातीलही कित्येक लोकांच्या पचनी पडला नाही व त्यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे मुस्लिम सहकारी आरिफ मोहम्मद खान यांनी मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

 

जनमत आपल्या विरुद्ध जात आहे असे लक्षात आल्यानंतर राजीव गांधींनी अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्याला आदेश देऊन अतिशय वेगाने हा दावा सुनावणीला घेण्याची सूचना केली व एक फेब्रुवारी १९८६ ला न्यायालयाने रामलल्लाच्या तंबू-वजा मंदिराचे दरवाजे उघडले व हिंदूंना रामलल्लाची पूजा करण्याची परवानगी दिली.

 

खरंतर न्यायालयाचा हा आदेश मानून मुस्लिमांनी रामलल्ला मंदिर हिंदूंच्या स्वाधीन करायला काही हरकत नव्हती. पण न्यायालयाच्या आदेशाचा निषेध म्हणून मुस्लिमांनी १४ फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून पाळला. १५ फेब्रुवारीला मुस्लिमांनी बाबरी मज्जिद कृती समितीची स्थापना केली व त्याआधीच १२ फेब्रुवारीला उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दावा दाखल केला. दुर्दैवाने या देशाच्या घटनेवर काडीमात्रही श्रद्धा, विश्वास नसलेल्या धर्मांध मुस्लिमांनी न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध आपली तीव्र प्रतिक्रिया देताना काश्मीरमध्ये ३४ हिंदू मंदिरे जाळून-पाडून उध्वस्त केली पण त्याविरुद्ध काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, निधर्मी, सर्वधर्मसमभाववादी, सेक्युलर व परदेशी पैशांवर एनजीओ चालवणारे सगळे मेणबत्तीवाले मूग गिळून गप्प बसले होते.

 

३० मार्च १९८७ ला बोटक्लबवर मुस्लिमांनी एक रॅली घेतली जी मुस्लिम नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याने गाजली. या रॅलीतील भाषणात जामा मस्जिदच्या शाही इमामांनी मुस्लिम मंत्र्यांनो डोळे उघडा नाहीतर आम्ही तुमची घरे लुटू-जाळू. तुमचे हातपाय तोडू. आम्ही पोलिसांनाही हीच शिक्षा करू. जामा मशिदीतून केव्हाही मी हा आदेश देईन. सरकार व न्यायालय यापैकी कशाचीही मी पर्वा करत नाहीअशी भडकावू भाषा वापरली

 

मुस्लिम नेत्यांच्या या चितावणीखोर वक्तव्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या. मुस्लिमांनी तर पोलिसांवरच गोळीबार करण्यापर्यंत मजल गाठली. या दंगली म्हणजे अक्षरशः जिहाद होता. आश्चर्याची गोष्ट अशी की या दंगलीत पकडले गेलेल्या अनेक मुस्लिमांपैकी २ हजाराहून अधिक पाकिस्तानी होते. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या पाकिस्तानी मुस्लिमांना आश्रय देऊन त्यांना दडविण्याचे काम येथील देशविरोधी मुस्लिमांनीच केले यात काही संशय नाही.

 

बाबरी मज्जिद कृती समितीने १४ ऑक्टोबर १९८८ ला अयोध्येमध्ये लाँगमार्च काढूनमंदिरात नमाज पडला जाईलअसे घोषित केले. याला प्रत्युत्तर म्हणून ८ ऑक्टोबरला बजरंग दलाने उत्तर प्रदेशातील सर्व शिक्षणसंस्था बंद पाडल्या व जामा मशिदीत जाऊन हनुमान चालीसा पढण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर ज्या दिवशी मुस्लिम लाँगमार्च काढतील त्याच दिवशी संपूर्ण उत्तर प्रदेशात बंद पाळला जाईल असे जाहीर केले. याला घाबरलेल्या खासदार शाहबुद्दीननी हा लाँगमार्च रद्द केला

 

डिसेंबर १९८८ मध्ये दिल्ली येथे विज्ञानभवनात चौथे आंतरराष्ट्रीय रामायण संमेलन पार पडले. २१ देशातील रामभक्त विद्वानांनी त्यात भाग घेतला. याच्या उद्घाटन समारंभा राष्ट्रपती रामस्वामी व्यंकटरमण म्हणाले श्रीराम भारताचेच नव्हेत तर अखिल विश्वाचे दैवत आहेत. रामकथा अनंतकाळ टिकणारी आहे. जोपर्यंत पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, नद्या अस्तित्वात असतील तोपर्यंत श्री रामांना विसरणे शक्य नाही. शिया मुसलमानांना याची जाणीव होती म्हणून त्यांनी श्रीरामजन्मभूमी हिंदूंना द्या असे सुन्नी मुसलमानांना पत्रक काढून आवाहन केले होते.

 

त्यानंतर सर्वात महत्वाची घटना १९८९ साली घडली. ३०-३१ जानेवारीला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर तृतीय धर्म संसद आयोजित केली होती व एक फेब्रुवारीला संत महासंमेलन आयोजित केले होते. त्यात एक लाखाहून अधिक साधुसंत-भक्त उपस्थित होते. या धर्मसंमेलनात ९ नोव्हेंबरला श्रीरामजन्मभूमीवर श्रीराममंदिराचा शिलान्यास केला जाईल व शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ३० सप्टेंबरला देशातील सर्व गावांमध्ये श्रीराम शिलापूजनाचे कार्यक्रम सुरू होतील अशी घोषणा करण्यात आली.

 

६ एप्रिल १९८९ ला मुंबई येथील शिवाजीपार्कवर आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी समारोह साजरा करण्यात आला. लाखांच्या विराट हिंदू समाजासमोर बोलताना अटल बिहारी बाजपेयी यांनी रामजन्मभूमी हा वादाचा विषय नाही, श्रद्धेचा विषय आहे. ती हिंदूंकडे सोपवणे हाच उपाय आहे असे सुस्पष्ट विचार मांडले व भारतीय जनता पक्ष तसेच संघ यांचा पुढील श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात काय सहभाग असू शकतो याचे संकेत दिले.

 

रस्त्यावरची लढाई लढताना न्यायालयीन लढाईत आपण कुठेच मागे पडू नये म्हणून विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष देवकीनंदन अग्रवाल यांनी १ जुलै १९८९ ला दिवाणी न्यायालयात रामलल्लाच्या वतीने एक अर्ज केला. कायद्यानुसार रामलल्ला ही विधीग्राह्य व्यक्ती असते म्हणून या अर्जाद्वारे अशी विनंती करण्यात आली की इमारत पाडून मंदिर बांधते वेळी प्रतिवादीकडून अडथळा येऊ नये म्हणून आदेश देण्यात यावेत तसेच रामलल्लाचा जवळचा मित्र म्हणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यास एखाद्या सुयोग्य व्यक्तीची नेमणूक करावी. या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने देवकीनंदन अग्रवाल यांनाच रामलल्लाचा जवळचा मित्र म्हणून घोषित केले. ज्याचा दूरगामी परिणाम भविष्यात पाहायला मिळणार होता

 

सोमवार, १७ मार्च, २०२५

 

संघ आणि आणीबाणी - उत्तरार्ध

 

संघबंदीच्या या काळात संघाशी संलग्न अशा अनेक संघटनांवर, काही घोषित तर काही अघोषित, बंदी आणण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ यासारख्या संघप्रणित संघटनांच्या नेत्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. संघाच्या व संघप्रणित संघटनांच्या कार्यालयांना टाळे लावण्यात आले होते. कित्येक कार्यकर्त्यांना जरी अटक झाली नव्हती तरी त्यांच्यावर पोलिसांची पाळत ठेवण्यात आली होती. फोन टॅप केले जात होते. आलेली पत्रे उघडून, तपासून पाहिली जात होती. संघस्वयंसेवकांच्या नातेवाईकांना व जवळच्या ओळखीच्या कुटुंबीयांना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात होता. या काळात संघाचे अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून आणीबाणीला विरोध करण्याचे काम करत होते. जनमत संघटित करत होते. या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्यासहित असे अनेक संघ स्वयंसेवक सामील होते.

 

या काळात संघाचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे संघस्वयंसेवकांनी देशाच्या अनेक भागात व विविध भाषेत चालू केलेली गुप्त वर्तमानपत्रे. भारतातील प्रमुख वर्तमानपत्रांचे मोठ्या प्रमाणात सेन्सॉरद्वारे नियंत्रण केलेले असल्याने, गुप्त वृत्तपत्रे आणि पॅम्प्लेट्स अन-सेन्सॉरर्ड माहितीचे प्रमुख स्त्रोत बनली. संघाचे स्वयंसेवक हे साहित्य लिहिणे, छापणे आणि वितरित करणे यात आघाडीवर होते. देशभरात वैयक्तिक धोका पत्करून आणीबाणीच्या दुष्परिणामाची माहिती लोकांपर्यंत जावी म्हणून चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल) मशिनवर छापलेली आणि हातोहात  वितरीत केलेली विविध मासिके, पाक्षिक किंवा नियतकालिके प्रकाशित होऊ लागली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी साहजिकच धरपकड टाळण्यासाठी, छपाईची ठिकाणे वारंवार बदलणे आणि वितरणासाठी विश्वसनीय संघस्वयंसेवकांचे नेटवर्क वापरणे याची पूर्ण खबरदारी घेतली होती. सांकेतिक भाषेचा व पूर्वनियोजित खाणाखुणा तसेच संकेतांचा वापर करून संघ प्रचारकांनी संघस्वयंसेवकांशी  संवाद आणि समन्वय राखला. संघाची पाळीमुळे पाळेमुळे समाजात खोलवर रुजल्याचा खूप फायदाही झाला. अगदी संघाशी संबंधित नसलेले सर्वसामान्य नागरिकही, संघाला पाठिंबा देऊ लागले. एकंदरीत, तळागाळातील संघाच्या प्रभावी सपोर्ट नेटवर्कमुळे संघाला तिची आणीबाणी विरुद्धची लढाई भूमिगत चळवळीमुळे  आणीबाणी संपेपर्यंत अखंडपणे चालू ठेवण्यात ठेवण्यास मदत झाली, एवढेच नव्हे तर ज्येष्ठ पत्रकार रामनाथ गोएंका यांच्या इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला तीव्र सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला तेव्हा गुप्तपणे छापलेल्या इंडियन एक्सप्रेसच्या अनधिकृत आवृत्या वाचकांपर्यंत पोहोचविणे संघाच्या या भूमिगत कार्यकर्त्यांच्या या जाळ्यामुळे शक्य झाले.

 

आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकल्यामुळे अनेक संघ स्वयंसेवकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योगधंदे बंद झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली. अनेक संघस्वयंसेवकांच्या मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडून उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी मिळेल ती नोकरी करावी लागली. आणीबाणीच्या काळा संघाने विभिन्न विचारांच्या पण आणीबाणी विरोधी पक्षांची संवाद साधत त्यांच्यात दुवा म्हणून काम केले. जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या विरोधात 'संपूर्ण क्रांती' ची हाक दिली तेव्हा संघ स्वयंसेवकांनी वैचारिक मतभेद बाजूस सारून या चळवळीला पाठिंबा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या १९ महिन्यात संघनेतृत्वाने तुरुंगात असताना विविध पक्षांच्या व विभिन्न विचारांच्या अनेक नेत्यांची संवाद साधून त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण केली व आणीबाणीला आपापसातील मतभेद विसरून एकसंघ पद्धतीने विरोध करण्याची मानसिक तयार केली.

 

याचा परिणाम असा झाला की आणीबाणीच्या १९ महिन्यानंतर इंदिराजींना त्यांच्या खुश-मस्कऱ्यांनी सांगितले की सामान्य जनता आणीबाणीवर खुश आहे आणि त्यांचा तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. जर अशा वेळी आपण निवडणूक घेतली तर काँग्रेस पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येईल. खुश-मस्कऱ्यांच्या या सांगण्यावर विश्वास ठेवून १८ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधींनी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची ही घोषणा केली व बहुतेक सर्व राजबंद्यांची तुरुंगातून सुटका केलीपरंतु परिस्थिती अतिशय भिन्न होती ज्याची कल्पना ना इंदिरा गांधींना होती ना तिचे सुपुत्र संजय गांधी, तत्कालीन संरक्षणमंत्री बन्सीलाल किंवा तत्कालीन दूरसंचार मंत्री विद्याचरण शुक्ला या बदनाम त्रिकुटाला.

 

१८ जानेवारी १९७७ साली इंदिरा गांधींनी निवडणुकीची घोषणा करताच तत्कालीन संघटना काँग्रेस, भारतीय  जनसंघ, स्वतंत्र पार्टी, भारतीय लोक द,  सोशलिस्ट पार्टी (जी पुढे प्रजा समाजवादी पार्टी व संयुक्त समाजवादी पार्टी या दोन पक्षांत विभागली गेली) या प्रमुख तसेच अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र येत जनता पार्टीची स्थापना केली व आपापले पक्ष जनता पार्टीत विलीन केले. सर्वानुमते जनता पार्टीचे नेतृत्व लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी करण्याचे ठरविले. त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीने १९७७ च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा दारुण पराभव केला व जनता पार्टी संपूर्ण बहुमत घेऊन विजयी झाली. स्वतः इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा त्यांच्या परंपरागत मतदार संघात पराभव झाला व त्यानंतर २४ मार्च १९७७  रोजी जनता पार्टीच्या व पहिल्या बिगर काँग्रेसी सरकारचा  शपथविधी पार पडला. मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान म्हणून तर जुन्या भारतीय जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्री, लाल कृष्ण आडवाणी यांनी माहिती व प्रसारण मंत्री तर सिकंदर भक्त यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून शपथ घेतली.

 

संविधानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवून कोणत्याही परिस्थितीत सत्ता सोडायची नाही या हव्यासापोटी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला केराची टोपली दाखवत सत्तेची मस्ती आलेल्या अनिर्बंध इंदिरा गांधींनी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा काळाकुट्ट इतिहास लिहून आपल्या  सत्तालोलुप वृत्तीचे दर्शन घडविले. पण त्याचवेळी संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या व लोकशाहीला मानणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी त्यागाचे, बलिदानाचे व समर्पणाचे एक मोठे उदाहरण जगासमोर घालून दिले. त्यांच्यामुळेच १९ महिन्याच्या लढ्यानंतर भारताला पुन्हा एकदा लोकशाहीचा सूर्योदय पाहत आला.

 

स्वामी विवेकानंदांच्या "उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका" या अजरामर वाक्याला अनुसरून स्वयंसेवकांनी आणीबाणीविरुद्ध सत्यासाठी व न्यायासाठी दिलेल्या लढ्यामुळेच आपण लोकशाही वाचविण्यात यशस्वी ठरलो. आणीबाणीच्या काळातील संघाची कामगिरी ही हुकूमशाही राजवटींचा सामना करताना सर्वसामान्य समाज संघटनांच्या असामान्य शक्तीचा असंदिग्ध पुरावा आहे. संघाच्या विचारसरणीशी कोणी सहमत असो वा नसो, आणीबाणीच्या काळात संघाची भूमिका व योगदान संघ विरोधकांसहित सर्वांना मान्य करावेच लागेल. संघाच्या आणीबाणीतील संघर्षाची गाथा वर्णन करण्यास शब्दांची मर्यादा आहे तरीही स्वतंत्र भारताच्या इतिहासात संघाचे हे योगदान अभूतपूर्व तसेच अविस्मरणीय आहे असेच म्हणावे लागेल.

बुधवार, १२ मार्च, २०२५

 

संघ आणि आणीबाणी - पूर्वार्ध

 

१९७५ साली लागलेल्या आणीबाणीची पार्श्वभूमी अतिशय रोचक आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७१ चे बांगलादेश मुक्तीसंग्राम म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध निर्णायक पद्धतीने जिंकले. बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानचे दोन तुकडे पडले. या विजयामुळे संघाचे सरकार्यवाह, जे नंतर संघाचे सरसंघचालक ही झाले, त्या सुदर्शनजींनी इंदिरा गांधींची स्तुती केली व संसदेत विरोधी पक्ष नेते व जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष अटल बिहारी बाजपेयी यांनी देखील इंदिरा गांधींचे अभिनंदन केले. हे युद्ध जिंकल्यामुळे इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेत नुसती भारतातच नव्हे तर जगभरात वाढ झाली आणि त्यामुळेच की काय इंदिरा गांधींच्या सुरुवातीच्या वागणुकीत आमुलाग्र बदल झाला. पॉवर करप्टस अँड ऍबसोल्युट पॉवर करप्टस ब्सुलेटली असे म्हणतात. त्यामुळे त्याकाळी इंदिरा गांधींच्या आजूबाजूला सत्तेचे दलाल असलेल्या चांडाळ चौकडीने प्रचंड भ्रष्टाचार करायला सुरुवात केली. विरोधकांना कस्पटासमान वागणूक देत त्यांचा आवाज दाबण्यास सुरुवात केली.

 

याविरुद्ध विरोधकांनी आवाज उठवायला सुरुवात केली. १९७४ साली गुजरातमध्ये चाललेल्या नवनिर्माण आंदोलन या विद्यार्थी आंदोलनाची परिणीती गुजरातमधील काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या राजीनाम्यात झाली. हे आंदोलन येथेच न थांबता त्याचे लोअगदी बिहारपर्यंत पसरले व तेथील विद्यार्थ्यांनी सुद्धा हे आंदोलन पुढे नेले. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्त या आंदोलनाचे नेतृत्व करण्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण तयार झाले. बघता बघता अनेक ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाले या आंदोलनाची झळ सरकारला बसू लागली. ठिक-ठिकाणी संप होऊ लागले. असंतोष वाढू लागला. जॉर्ज फर्नांडिस यांनी तर अगदी बेमुदत रेल्वे बंदची हाक दिली व बंद चिघळू लागले.

 

त्यातच १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या निवडणुकीला आव्हान देणारी समाजवादी नेते राज नारायण यांच्या याचिकेवर निकाल देत  इंदिरा गांधींची खासदारकीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीस उभे राहण्यास मज्जाव करण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी व्हायच्या आतच इंदिरा गांधींनी रातोरात अध्यादेश काढून एक कायदा पारित केला व त्याला राष्ट्रपतींची संमतीही मिळविली. या कायद्यात हायकोर्टाने दिलेला निर्णय पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीला पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही अशी तरतूद होती. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला गेला. याच्या विरुद्ध जेव्हा विरोधी पक्षाने रान उठवले तेव्हा २५ जून १९७५ च्या रात्री, २६ जून १९७५ च्या पहाटे-पहाटे इंदिरा गांधींनी आपत्काल घोषित केला. देशभरात आणीबाणी लागली. लगेचच  लाखाहून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांना  अटक करण्यात आली व त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. 


यात मुख्यत्वे पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाचे  अटल बिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी,  मुरली मनोहर जोशी, वेदव्यास श्रीनिवास आचार्य, सतीश चंद्र अग्रवाल, रामादेवी, रघुबर दास, नानाजी देशमुख, गायत्री देवी, अरुण जेटली, सत्यनारायण जतिया, प्रकाश जावडेकर, अण्णा जोशी, ओम् प्रकाश कोहली, भगत सिंह कोश्यारी, अनंत कुमार, बंगारू लक्ष्मण, बलराज मधोक, प्रमोद महाजन, विजय कुमार मल्होत्रा, जयवंतीबेन मेहता, रामभाऊ म्हाळगी, करिया मुंडा, गोपीनाथ मुंडे, व्यंकय्या नायडू, मुख्तार अब्बास नक्वी, सी विद्यासागर राव, विजया राजे सिंधिया, वीरेन शाह, भैरव सिंह शेखावत, वजुभाई वाला, कमला वर्मा, बी. एस. येदियुरप्पा यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते. आणीबाणीमुळे मिळालेल्या अनिर्बंध अधिकारांचा उपयोग करत इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली व सरसंघचालक बाळासाहेब देवरसांसहित, नानाजी देशमुख, सुदर्शनजी, दत्तात्रेय होसबाळे यांच्यासारख्या लाखो संघस्वयंसेवकांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले.

 

आणीबाणीच्या काळात वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप टाकण्यात आली. नागरीकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांचे घटनादत्त अधिकार काढून घेण्यात आले. रीट पिटीशन व हेबियर्स कॉपर्स सारख्या न्यायालयीन आयुधांवर देखील बंदी घालण्यात घालून न्यायालयांच्या अधिकारांची पायमल्ली करण्यात आली

 

त्या काळात वर्तमानपत्रे हीच फक्त लोकांना माहिती मिळविण्याचे साधन होते. बाकी आकाशवाणी व दूरदर्शन ही माध्यमे पूर्णपणे एखाद्या गुलामाप्रमाणे सरकारच्या आधीन होती. आणीबाणीमध्ये सर्व वर्तमानपत्रांवर निर्बंध घालण्यात आले व त्यातील प्रत्येक बातमी व लेख सरकारी अधिकारी वाचून त्यानंतरच तो प्रकाशित करायला परवानगी देत. अशा रीतीने लोकशाहीच्या चौथ्या खांबावरच घाला घालण्यात आला. कित्येक वर्तमानपत्रे तर आपला कोरा अग्रलेख किंवा संपादकीय प्रकाशित करून अप्रत्यक्षरीत्या आणीबाणीला विरोध करत.

 

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या काळात इंडियन एक्सप्रेसचे संपादक कुलदीप नैय्यर सहित २६३ जेष्ठ पत्रकार व संपादकांना सुद्धा अटक करण्यात आली होती. द मदरलँडचे संपादक के आर मलकानी हे भारतात आणीबाणीत अटक झालेले पहिले पत्रकार होते.   जून १९७५ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पंडारा रोड येथील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. आणीबाणीचा  २ महिन्यांचा  संपूर्ण कालावधी मलकानींनी  तुरुंगात काढला यावरून इंदिरा गांधींचा मलकानींवर किती राग होता हे समजते.

 

या पार्श्वभूमीवर संघाने आणीबाणीला सक्रिय विरोध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी संघाने अखिल भारतीय लोकसंघर्ष समितीचीस्थापना करून त्या समितीच्या बॅनरखाली लोकशाही वाचविण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची रक्षा करण्यासाठी आपला लढा चालू ठेवला. १४  नोव्हेंबर १९७५ रोजी संघाने देशव्यापी सत्याग्रहाची हाक दिली ज्यात अक्षरशः लाखो संघस्वयंसेवकांनी भाग घेऊन आणीबाणीला आपला असलेला विरोध नोंदवून इंदिरा गांधींच्या जुलमी राजवटीला हादरा दिला. पोलिसांनी देशभरातील ८० हजारहून अधिक संघ स्वयंसेवकांची धरपकड करून त्यांना तुरुंगात टाकले व हा लढा मोडून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आणीबाणीच्या काळात संघ स्वयंसेवकांवर मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार झाले. देशभरातील संघस्वयंसेवकांनी तुरुंग भरून गेले होते. अंतर्गत सुरक्षा कायद्या खाली (मिसा) ताब्यात घेतलेल्या संघस्वयंसेवकांची संख्या २३,०१५ होती, ज्यात ७७ महिलांचा समावेश होता.


आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या संघ कार्यकर्त्यांची संख्या ४४,५ होती, तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची संख्या केवळ ९,६५५ होती यावरून आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात संघाचा सिंहाचा वाटा होता हे सिद्ध होते. आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणाऱ्या १,३०,००० सत्याग्रहींपैकी १,००,००० पेक्षा जास्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते. कारागृहात पाठवण्यापूर्वी, आणीबाणीच्या काळात अटक केलेल्यांना पोलीस लॉकअपमध्ये ठेवायचे आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचार करायचे. यापैकी कित्येक जण आयुष्यभरासाठी अपंग झाले, काहींनी आपली दृष्टी गमावली. आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय व्यवस्थापन समितीचे  प्रमुख पांडुरंग क्षीरसागर यांच्यासह संघाच्या १०० हून अधिक कार्यकर्त्यांचे पोलिसांच्या मारहाणीमुळे दुर्दैवाने तुरुंगातच निधन झाले.

 

आणीबाणीच्या या कालखंडात इंदिरापुत्र संजय गांधी व त्याच्या टोळक्याने अनेक दुष्कृत्ये केली. त्यात प्रामुख्याने जबरदस्तीने झालेली नसबंदीची प्रकरणे तसेच तुर्कमनगेट जवळ बुलडोझर लावून जबरदस्तीने तोडण्यात आलेली गरीब नागरिकांची घरे हे दोन मुद्दे प्रकर्षाने गाजले. लोकांमध्ये संतापाचा आगडोंग उसळला व म्हणता म्हणता आणीबाणीविरुद्ध जनमत संघटित झाले.

 

 

 


सोमवार, १० मार्च, २०२५

 संघाची संरचना

 

संघाची कार्यपद्धती जशी आगळी-वेगळी आहे तशीच संघाची संरचना सुद्धा आगळी-वेगळी आहे. स्वयंसेवक ते सरसंघचालक या दोन अतिमहत्त्वाच्या घटकाना खालून-वर तसेच वरून-खाली जोडणारी संघाच्या संरचनेची साखळी मुळापासून समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

वाडी-वस्तीमध्ये लागणारी संघशाखा ही संघस्वयंसेवकांना एकत्र करणारी संघ संरचनेची पाहिली पायरी आहे तर संघातील सर्वोच्च निर्णय घेणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघ संरचनेतील अंतिम पायरी आहे. संघाने संघशाखा ते अखिल भारतीय प्रतिनिधी सभा या दोन शेवटच्या टोकांवर असलेल्या पायऱ्यांना अतिशय साध्या परंतु प्रभावी पद्धतीने जोडले आहे. त्यात संघ शाखेनंतर वस्ती किंवा ग्राम, भाग किंवा तालुका, नगर किंवा जिल्हा, विभाग, प्रांत, क्षेत्र असे विस्तारित जाणारे कार्यक्षेत्र व त्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या संघाच्या अधिकाऱ्यांची विशिष्ट जबाबदारी देऊन केलेली नेमणूक व नेमणुकीची पद्धत महत्त्वाची आहे.

 

सर्वसाधारणपणे आठ ते दहा हजार लोकवस्तीचा भाग तयार करून त्याला वस्ती किंवा ग्राम असे संबोधण्यात येते. त्याच्या प्रमुखाला वस्तीप्रमुख किंवा ग्रामप्रमुखअसे म्हटले जाते.  सोयीप्रमाणे या वस्त्यांमध्ये अनेक शाखा लावण्यात येतात. प्रत्येक शाखेच्या मुख्य स्वयंसेवकाला शाखा कार्यवाह म्हटले जाते, ज्याच्यावर संपूर्ण शाखेची जबाबदारी असते.  दररोज शाखेत उपस्थित राहून शाखेतील दैनंदिन कार्यक्रम करण्याची ज्या स्वयंसेवकाची जबाबदारी असते त्याला मुख्यशिक्षक असे म्हटले जाते. साधारणपणे शाळेत जाणाऱ्या बाल स्वयंसेवकांसाठीमहाविद्यालयामध्ये जाणाऱ्या युवा स्वयंसेवकांसाठी४० वर्षापर्यंतच्या नोकरी, शेती किंवा व्यवसाय करणाऱ्या तरुण स्वयंसेवकांसाठी व ४० वर्षाहून अधिक य असलेल्या प्रौढ स्वयंसेवकांसाठी वेगवेगळ्या शाखा लावणे अपेक्षित आहे. पण हे न जमल्यास सर्वजण एकत्र येऊनही संयुक्त शाखा लावू शकतात.

 

सात ते दहा वस्त्यांचा मिळून शहरात नगरतर ग्रामीण भागात तालुका तयार होतो. अशा नगराच्या प्रमुखाला नगर संघचालक व त्याला मदत करण्यासाठी  जो स्वयंसेवक  जबाबदारी घेतो त्याला सह नगरसंघचालक असे म्हणतात.  त्याचप्रमाणे  नगराचे दैनंदिन  कामकाज पाहण्यासाठी नगर कार्यवाह व त्याच्या जोडीला सह नगरकार्यवाह नेमले जातात. बौद्धिक प्रमुख, शारीरिक प्रमुख, व्यवस्था प्रमुख, सेवाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रचार प्रमुख, बाल स्वयंसेवक प्रमुख, व्यवसाय स्वयंसेवक प्रमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक प्रमुख अशी त्या-त्या क्षेत्रात काम करण्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदारी दिली जाते. अशाप्रकारे साधारणपणे १३  जणांची समिती त्या-त्या नगरात किंवा तालुक्यात चालणाऱ्या संघकार्यास जबाबदार असते. प्रत्येक नगरात किंवा तालुक्यात संघाचे पूर्णवेळ काम करण्यासाठी पूर्णवेळ प्रचारकाची नियुक्ती केली जाते त्याला ‘नगर प्रचारक किंवा तालुका प्रचारक असे म्हणतात. प्रचारकाचे मुख्य काम हे संघ वाढविणे हे असून त्याच्या दिलेल्या कार्यक्षेत्रात नवीन स्वयंसेवकांना जोडणेनवीन कुटुंबांना जोडणेशाखेच्या संख्येत वाढ करणेसंघाने घेतलेले वेगवेगळे विषय व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविणे व आपल्या कार्यक्षेत्रात राबवणे हे आहे.

 

शहरी भागात सात ते दहा नगरांचा एक भागतर ग्रामीण भागात सात ते दहा तालुक्यांचा एक जिल्हा तयार होतो व त्यातही संघकार्य करण्यासाठी अगदी आधी सांगितल्याप्रमाणे व नगर किंवा तालुक्याला असते काहीशी तशीच संरचना केली जाते. या विस्तारित क्षेत्रात असलेल्या पूर्णवेळ प्रचारकाला भाग प्रचारक किंवा जिल्हा प्रचारक असे म्हणतात.

 

दोन ते तीन जिल्ह्यांचा किंवा भागांचा एक विभाग तयार होतो व या विभागात असलेल्या पूर्णवेळ प्रचारकाला विभाग प्रचारक असे म्हणतात. सहा ते नऊ विभागांचा एक प्रांत तयार होतो व या प्रांतात असलेल्या पूर्णवेळ प्रचारकाला प्रांत प्रचारक असे म्हणतात.

 

दोन ते तीन प्रांत एकत्रित करून त्यांना क्षेत्र असे संबोधले जाते ज्यामध्ये क्षेत्र प्रचारक या नावाने ओळखला जाणारा ज्येष्ठ संघस्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ काम करीत असतो. नगर वा तालुका, भाग वा जिल्हाविभाग, प्रांत, क्षेत्र असो, संघाची संरचना तालुका किंवा नगरामध्ये असलेल्या संरचनेसारखीच असते.

 

संघाच्या या उभ्या म्हणजेच व्हर्टिकल ऑर्गनायझेशन बरोबरच संघाची आडवी म्हणजेच हॉरीझोंटल ऑर्गनायझेशन देखील संघटना बांधणीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असते. वेगवेगळ्या विषयांवर त्या - त्या विषयांमध्ये अधिक रुची असणारे, प्रशिक्षित व पारंगत असे संघस्वयंसेवक संघाचे बौद्धिक, शारीरिक, व्यवस्था, सेवा, संपर्क व प्रचार आदी विषय हाताळतात. त्यांना अनुक्रमे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख’, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख’, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख’, अखिल भारतीय सेवा प्रमुख’, अखिल भारतीय संपर्कप्रमुखअखिल भारतीय प्रचार प्रमुख असे म्हटले जाते. आपल्या दिलेल्या विषयांसाठी नगर किंवा तालुक्यापासून अगदी क्षेत्रापर्यंत त्या-त्या विषयाशी संबंधित संघस्वयंसेवकांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी जबाबदारीचे वाटप करणे हे अखिल भारतीय प्रमुखाचे काम असते.

 

सर्वसाधारणपणे नगरापासूनच्या प्रांतापर्यंत संघाच्या जबाबदाऱ्यांची मुदत ही तीन वर्षापर्यंतच मर्यादीत असते.  र तीन वर्षानंतर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत जबाबदाऱ्यांमध्ये गरजेनुसार बदल केले जातात. याचबरोबर याच सभेत एका स्वयंसेवकाची सरकार्यवाह म्हणून निवड होते व त्याच्या जोडीला सहसरकार्यवाह’, आदी एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते.  तसेच अखिल भारतीय स्तरावर बौद्धिक, शारीरिक, व्यवस्था, सेवा, संपर्क व प्रचार प्रमुख ही निवडले जातात. पदाधिकारी निवडीची ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय लोकशाही पद्धतीने, सर्वांच्या संमतीने व उघडपणे केली जाते.

 

प्रतिनिधी सभेने निवडलेल्या सरकार्यवाह, सहसरकार्यवाह तसेच अखिल भारतीय स्तरावर बौद्धिक, शारीरिक, व्यवस्था, सेवा, संपर्क व प्रचार प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांची व काही महत्वाचे निमंत्रित अशा सुमारे ६० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी बनते. या कार्यकारिणीला संघाचे धोरण ठरविण्याचे अधिकार असतात. कार्यकारिणीत प्रत्येक विषयांवर सांगोपांग चर्चा होते व नंतर त्या धोरणाची सरसंघचालक अथवा सरकार्यवाह यांच्यापैकी एकाकडून घोषणा केली जाते. दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत वेगवेगळ्या विषयांवरील ठराव पारित होतात ज्यांच्या पूर्ततेसाठी पुढील वर्षातील संपूर्ण कार्यक्रम ठरविला जातो ज्यात सहसा बदल केला जात नाही.  हा संपूर्ण कार्यक्रम एकदा ठरला की अगदी वाडी-वस्तीपर्यंत तो पोहोचविण्याची व अमलात आणण्याची संघाची क्षमता ही जशी संघाने निर्माण केलेल्या या अद्वितीय संघटन साखळीमध्ये आहे तशीच ती ध्येयासक्तीने भारलेल्या, संघसमर्पित स्वयंसेवकांमुळे ही आहे. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा अपवाद वगळता गुरुजींपासून अगदी सद्य सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवतांपर्यंत सर्वांनीच सरसंघचालक म्हणून जबाबदारी घेण्याआधी संघातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपले वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व गुण सिद्ध केले व त्यामुळेच की काय आद्य सरसंघचालकांना अपेक्षित असलेले संघकार्य त्यांच्या हातून यशस्वीपणे घडत गेले.

 

ज्याप्रमाणे सुरेख वस्त्र विणत असताना कुशल विणकर अतिशय काळजीपूर्वक उभ्या व आडव्या धाग्यांचा उपयोग करतो, ज्याला ताना-बाना असेही म्हणता, तशाच प्रकारे उभ्या व आडव्या संघटन पद्धतीचा संघाने सुरेख मेळ घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सातत्याने वाढणारी १०० वर्ष जुनी अभेद्य संघटना उभी केली आहे.  संघाच्या या अद्वितीय संघटन कौशल्याचा जगाच्या अनेक महाविद्यालयात अभ्यास होत आहे व त्यावर कित्येकांनी  संशोधन करून विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी ही प्राप्त केली आहे.

गुरुवार, ६ मार्च, २०२५

 गांधी हत्या आणि संघ - प्रतिकार

 

गुरुजींच्या या पत्राचा प्रचंड मोठा प्रभाव संघ स्वयंसेवकांवर पडला. ग्राम, तालुका, शहर, जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी संघ स्वयंसेवकांनी सत्याग्रह केले. या सत्याग्रहात कोणतेही अनुचि प्रकार घडले नाहीत. किंबहुना पोलिसांना संपूर्ण सहकार्य करून हे सत्याग्रह पार पाडण्यात आले. या सत्याग्रहात भारत माता की जय आणि संघ अमर रहे या केवळ दोनच घोषणा दिल्या गेल्या व अटक झाल्यावर सत्याग्रहींनी कोणताही प्रतिकार न करता स्वच्छने कारागृहात जाणे पसंत केले. कोणतीही हाणामारी नाही, कोणतीही हिंसा नाही, कोणताही विरोध नाही असे आंदोलन पोलिसांनी सुद्धा प्रथमच पाहिले होते. हा-हा म्हणता देशभरात ६०,००० हून अधिक संघस्वयंसेवक तुरुंगात गेले व त्यांनी ज्या गांधीहत्येच्या कारणावरून संघावर बंदी घालण्यात आली होती त्या गांधीजींनीच दाखविलेला अहिंसात्मक व सविनय सत्याग्रह कसा असतो हे दाखवून दिले.

 

सुमारे दीड महिना चाललेल्या या सत्याग्रहामुळे अनेकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या व लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या केसरीमध्ये ग. वि. केतकरांनी संघाची बाजू मांडणारा व संघाच्या निडर वृत्तीची प्रशंसा करणारा पहिली फाशी नंतर चौकशी या मथळ्याचा लेख लिहिला. शासनाने केतकर यांना गुरुजींची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकण्याची विनंती केली. त्याप्रमाणे नागपूर मधील कारागृहात १२ जानेवारी १९४९  रोजी त्यांनी गुरुजींची भेट घेतली. संघ आणि सरकारमध्ये चाललेल्या या संघर्षात मार्ग काढण्यासाठी केतकर यांनी गुरुजींना सत्याग्रह स्थगित करण्याची विनंती केली. गुरुजींनी ती ताबडतोब मान्य केली. त्यानुसार २२ जानेवारी पासून सत्याग्रह स्थगित करण्यात आला. त्यानंतर केतकरांनी २९ जानेवारी रोजी पुन्हा एकदा गुरुजींची भेट घेऊन त्यांच्याशी संघबंदी सहित अनेक बाबींवर चर्चा केली.

 

संघाची लिखित घटना नाही हा सरकारचा एक आक्षेप होता. त्यावेळी मद्रास प्रेसीडेंसीचे एडव्होकेट जनरल असलेले प्रख्यात वकील श्री. टी. आर. वेंकटराम शास्त्री यांच्या मध्यस्थीने संघाची अलिखित स्वरूपात चाललेली कार्यपद्धती लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली गेली. यात काहीही गैर नसल्यामुळे संघाने ती त्वरित मान्य केली. काँग्रेस सरकारचा असा ही आग्रह होता की संघाने गुरुदक्षिणेचा हिशोब प्रसिद्ध करावा. परंतु काँग्रेसनेच आजगायत स्वराज्य फंड अंतर्गत जमा केलेल्या निधीचा कधीच हिशोब दिला नव्हता. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे संघाच्या गुरुदक्षिणेचा हिशोब मागण्याचा नैतिक अधिकारच नव्हता. यामुळे सरकारनेच आपल्या या आग्रहामुळे काँग्रेसच अडचणीत येऊ शकते हे लक्षात आल्यामुळे हा आग्रह आपणहून मागे घेतलाया व अशा तऱ्हेने सरकार व संघ यांच्या दरम्यान असलेल्या तणावावर मार्ग काढण्यासाठी संघाने स्वतः हून अनेक पावले पुढे येत आपल्याकडून सरकारशी सहकार्याचीच भूमिका आहे हे वारंवार सिद्ध केले. पण एवढे करूनही दुराग्रही नेहरूंच्या हट्टापायी संघावरील बंदी उठण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती.

 

यादरम्यान ट्रिब्युन स्टेट्समन सारख्या नावाजलेल्या तसेच अनेक इतर वर्तमानपत्रातून संघाच्या बाजूने अनेक लेख प्रसिद्ध झाले. संघबंदीला विरोध करण्यासाठी लाखो पत्रे सरकारला पाठविण्यात आली. अनेक विचारवंत व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी संघावर बंदी घालणे चुकीचे आहे हे सरकारला खडसावून सांगितले

 

तरीही सरकारकडून संघबंदी उठविण्यासंबंधी काहीही हालचाल होत नाही हे लक्षात आल्यानंतर १७ मे रोजी गुरुजींनी सरकारला कडक शब्दात एक पत्र पाठविले. ज्यात त्यांनी अनेक गोष्टींबद्दल सरकारला जाब विचारला. एकीकडे समाजामध्ये सरकारवरची टीका वाढत होती तर दुसरीकडे संघाला चहुबाजूने पाठिंबा मिळत होता. अशा परिस्थितीत सरकारच्या वतीने भारतीय जनाधिकार समितीचे अध्यक्ष पंडित मौलीचंद्र शर्मा यांनी सहकार्यवाह भैय्याजी दाणी व बाळासाहेब देवरस यांची भेट घेतली व त्यानंतर ते कारागृहात असलेल्या गुरुजींनाही भेटले. सरकारने संघावर अनेक आक्षेप नोंदवले होते. त्यातील सर्वच्या सर्व आक्षेप हे मूर्खपणाच्या कसोटीवर घासून घेतलेले होते. देशाची घटना व राष्ट्रध्वजाप्रति आदर, हिंसाचार, संघामधील बाल स्वयंसेवकांचा प्रवेश, सरसंघचालकांची नियुक्ती, हिशोब ठेवण्याची पद्धत अश्या  गोष्टीं बद्दलच्या आक्षेपांचा उल्लेख पंडित मौलीचंद्र शर्मा यांनी गुरुजींबरोबरच्या चर्चेत केला.

 

संघावरील बंदी एनकेन प्रकारे लांबवावी म्हणून सरकारने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले होते.  संघाने आपली जी लिखित घटना सरकारला पाठविली होती त्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव एच व्ही आर अय्यंगार यांनी काही आक्षेप नोंदविले होते. त्याला उत्तर देताना गुरुजींनी संघाची घटना व काँग्रेसची घटना ही जवळजवळ कशी समान आहे हे दाखवून त्यांच्या आक्षेपातील हवाच काढून टाकली

 

सरकारच्या या वेळकाढूपणाच्या धोरणाला सरकारच्या वतीने मध्यस्थी करणारे वेंकटराम शास्त्री हे एवढे वैतागले होते की त्यांनी सरकारच्या या सर्व बालिश आक्षेपांना उत्तर देणारे एक प्रसिद्धी पत्रकच ११ जुलैला सर्व वर्तमानपत्रांना पाठवून दिले होते. त्यांच्या या प्रसिद्धी पत्रकातील मुद्दे एवढे तर्कशुद्ध होते की त्यामुळे सरकारची बोलतीच बंद झाली. वेंकटराम शास्त्रींचे हे प्रसिद्धी पत्रक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्यापूर्वीच एक दिवस आधी ते सरकारच्या हाती पडले व सरकारने घाईघाईने संघबंदी मागे घेतली हा निश्चितच योगायोग नसावा. संघाशी संबंधित नसलेल्या व संपूर्णपणे निष्पक्ष असलेल्या, तसेच सरकारच्या वतीने मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीच्या केवळ एका पत्राने सरकारला उशिरा का होईना आपली चूक कळली १२ जुलै १९४९ रोजी संघबंदी बिनशर्त मागे घेतली. सवयी प्रमाणे नेहरु व त्यांचे चेले-चपाटे पुन्हा एकदा नाका-तोंडावर आपटले.

 

१३ जुलै १९४९ रोजी गुरुजींची कारागृहातुन बिनशर्त सन्मानाने सुटका करण्यात आली यावरून संघबंदीची कारणे केवढी तकलादू व निखालस खोटी होती हे सिद्ध होते.

 

संघावरील बंदी उठवल्यानंतर गुरुजींनी भारतात सर्वत्र प्रवास केला. सगळीकडे त्यांचे देवदुर्लभ स्वागत झाले. रामलीला मैदानावर झालेल्या सभेत तर त्यांचे स्वागत करण्यासाठी पाच लाखाहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजतागायत याहून मोठी सभा झाली नाही हा रेकॉर्ड आहे.

 

मोतीलाल नेहरू सारख्या गडगंज संपत्ती असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षाचा पुत्र म्हणून कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या, पंतप्रधान म्हणून संपूर्ण शासकीय यंत्रणा हातात असलेल्या, ४३ वर्षाहून अधिक काळ राजकारणाचा अनुभव असलेल्या, ६० वर्षाच्या नेहरू सारख्या भारतातील त्या काळच्या सर्वात प्रसिद्ध नेत्याविरुद्ध राजकारणाचा काडीचाही संबंध नसलेल्या, कोणतीही कौटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, केवळ एका स्वयंसेवी संघटनेचा ४३ वर्षाचा नेता यांच्यातील ही संपूर्ण असमतोल लढाई केवळ आपल्या बुद्धीच्या, तर्कांच्या, विवेकाच्या, संयमाच्या जीवावर व ज्या तत्त्वांसाठी आपण काम करीत आहोत त्या तत्त्वांवर असलेल्या अगाढ श्रद्धेच्या बळावर शेवटी त्या माधव सदाशिव गोळवलकर नावाच्या ४३ वर्षाच्या तरुण नेत्यानेच जिंकली. नेहरूंच्या सरकारला संघावरील बंदी बिनशर्त मागे घ्यावी लागली. हा संघ विचारांचा विजय व नेहरूंच्या तुष्टीकरण नीतीचा पराभव मानावा लागेल.